झाडावर राहणाऱ्या बेडकाच्या दोन नवीन प्रजाती पश्चिम घाटात सापडल्या आहेत.
अनिल झछारिया व रॉबिन कुरियन यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत त्यांचा शोध लागला आहे.
'झूटॅक्सा' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
यातील एका प्रजातीला कर्नल रिचर्ड हेन्री बेडोम यांच्या नावावरून 'बेडोमिक्सालस' असे नाव दिले आहे.
ब्रिटिश काळात मुख्य वनसंवर्धक असताना बेडोम यांनी बरेच मोठे काम केले आहे.
दुसऱ्या प्रजातीला 'मरक्युराना' असे नाव दिले आहे. ब्रिटिश रॉक बँडमधील गायक फ्रेडी मक्र्युरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे नाव दिले आहे. पश्चिम घाटात झाडावर राहणाऱ्या बेडकांच्या ७ प्रजाती आतापर्यंत सापडल्या आहेत.
No comments:
Post a Comment