माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्याविरोधात अटक वॉरण्ट
आपल्या राजवटीत एका न्यायाधीशाला अटक करून डांबून ठेवल्याप्रकरणी मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्याविरोधात मालदीवच्या न्यायालयाने अटक वॉरण्ट जारी केले.
मालेमधील भारतीय दूतावासाने आपल्याला आश्रय द्यावा, अशी विनंती नाशीद यांनी केली आहे.
हे वॉरण्ट जारी करण्यात आल्यानंतर नशीद हे तातडीने भारतीय दूतावासाकडे रवानाही झाले.
आपली सुरक्षा आणि हिंदी महासागरातील एकूण स्थैर्यासाठी आपण मालदीवमधील भारतीय दूतावासाचा आश्रय घेतल्याचे नशीद यांनी ट्विटरवर नमूद केले.
११ दिवस भारतीय दूतावासात आश्रय घेतला होता.
दूतावासातून बाहेर पडताच त्यांना अटक झाली.
आपली अटक हा राजकीय कट असल्याचा आरोप नाशीद यांनी केला .
No comments:
Post a Comment