धोकादायक व प्रदूषणयुक्त कचरा व टाकाऊ सामग्री निर्मितीत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.
देशात वर्षभरात तयार होणाऱ्या 79 लाख टनांपैकी राज्यातील कचऱ्याचा वाटा सर्वाधिक 22.84 टक्के इतका असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात (22.68 टक्के) आणि आंध्र प्रदेश (13.75) यांचे क्रमांक आहेत.
महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, मध्य प्रदेश व छत्तीसगड ही सात राज्ये मिळून देशातील 82 टक्के प्रदूषणयुक्त कचऱ्याची निर्मिती करतात.
सिमेंट, वीजनिर्मिती, पोलाद उद्योग आणि कालबाह्य टाकाऊ संगणक हे या घातक प्रदूषणयुक्त कचऱ्याच्या निर्मितीचे प्रमुख स्रोत आहेत.
कचऱ्यावरील प्रक्रिया करणारे प्रकल्प 16 राज्यांमध्ये उभारण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात असे तीन प्रकल्प आहेत.
धोकादायक कचरा...
देशात वर्षभरात तयार होणारा कचरा =79 लाख टन
महाराष्ट्राचा वाटा=22.84 टक्के
कचऱ्यावर प्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील प्रकल्प=3
सात राज्यांकडून होणारी कचऱ्याची निर्मिती =82 टक्के
To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in
No comments:
Post a Comment