युनेस्कोने आपल्या मनुष्य व जीवमंडळ कार्यक्रमांतर्गत भारताच्या निकोबार बेटांचा समावेश जागतिक जीवमंडळ क्षेत्रामध्ये (बायोस्फिअर रिजर्व) केला आहे.
या कार्यक्रमांतर्गत युनेस्कोचे सभासद देश देशामध्ये अशा प्रकारच्या जीवमंडळ क्षेत्राची स्थापना करतात.
येथील स्थानिक रहिवासी व विज्ञान यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून या क्षेत्राचा समतोल विकास साधला जातो.
निसर्ग व्यवस्थापनाच्या नव्या पद्धती व मानवी सहभागाचे परीक्षण, या निसर्ग व मानव यांच्यामधील नात्याचा आदर्श म्हणून गणल्या गेलेल्या जीवमंडळ क्षेत्रांमधून केले जाते.
निकोबार बेटांवर सुमारे 1800 वन्य जाती व जगामधील काही अतिसंरक्षित जमातींचा निवास आहे. निकोबार बेटांखेरीज जगामधील अन्य 11 नव्या ठिकाणांचा समावेश जागतिक जीवमंडळ क्षेत्र कार्यक्रमांतर्गत केला गेला आहे.
जगभरातील 117 देशांमध्ये अशा प्रकारची जीवमंडळ क्षेत्रे असून भारतामध्ये अशा प्रकारची 9 जीवमंडळ क्षेत्रे आहेत.
पाकिस्तानमधील झिरारत जंगल व चीनमधील स्नेक आयलंड या ठिकाणांचाही समावेश जीवमंडळ क्षेत्रामध्ये करण्यात आला आहे.
To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in
No comments:
Post a Comment