जागतिक तापमानाच्या पाहणीनंतर 'नासा'च्या शास्त्रज्ञांचे मत
सरलेल्या २०१२ या वर्षांत सरासरी तापमान १४.६ अंश सेल्सिअस इतके होते आणि १८८० पासून कोणत्याही वर्षांपेक्षा तापमानाच्या बाबतीत २०१२ चा नववा क्रमांक लागतो, असे 'नासा'च्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
सन १८८० पासून आतापर्यंत १९९८ चा अपवाद वगळल्यास २०००, २००५ आणि २०१० आणि २०१२ या वर्षांमध्ये उष्णतेची पातळी सर्वाधिक होती.
न्यूयॉर्कमधील 'नासा'च्या गोडार्ड या अंतराळ अभ्यास संस्थेने जागतिक तापमानाचा आढावा घेतला आणि त्याची माहिती दिली.
सरासरी वैश्विक तापमान १८८० पासून ०.८ अंश सेल्सिअसने वाढले आहे, असेही अभ्यासात आढळले आहे.
No comments:
Post a Comment