'भारताच्या कांस्य महिला' या नावाने परिचित असलेल्या प्रख्यात मूर्तिकार जसू शिल्पी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने निधन झाले. त्या ६४ वर्षांच्या होत्या.
कांस्य धातूपासून मूर्ती तयार करणाऱ्या कलाकार म्हणून जसू शिल्पी यांना जगभरात मान होता.
त्यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही पटकावले होते. गुजरातमधील महात्मा गांधींचा पुतळा, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे शिल्पी यांनी तयार केलेले पुतळे रेखीव आहेत.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी २२५ मोठे तर ५२५ मध्यम आकाराचे कांस्य पुतळे घडविले.
त्यांनी तयार केलेला मार्टिन ल्युथर किंग यांचा पुतळा फ्लोरिडा विद्यापीठात बसविण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment