Sunday 8 September 2013

भारत निर्माण कार्यक्रम

दहाव्या पंचवार्षकि योजनेच्या काळात म्हणजेच २००५ या वर्षांपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध योजनेतील दोष दूर करून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी हा कालबद्ध कार्यक्रम सुरू करण्यात आला. या योजनेचा पहिला टप्पा २००५ ते २००९ असा होता. तर दुसरा टप्पा २००९ ते २०१४ असा आहे. या कार्यक्रमात सहा घटक आहेत- पाणीपुरवठा, रस्ते, गृहबांधणी, दूरध्वनी, विद्युत, जलसिंचन. उद्दिष्टे पुढीलप्रमाणे -
- २०१२ पर्यंत सपाट प्रदेशातील एक हजार लोकसंख्येपेक्षा अधिकच्या व डोंगराळ परिसरातील ५०० लोकसंख्येपेक्षा अधिकच्या सर्व खेडय़ांना पक्क्या रस्त्यांनी जोडणे.
- २०१२ पर्यंत सर्व वंचित गावांना सुरक्षित पेयजलाचा पुरवठा करणे.
- २०१२ पर्यंत अतिरिक्त एक कोटी हेक्टर जलसिंचनाखाली आणणे.
- २०१४ पर्यंत किमान ४०% ग्रामीण भाग दूरध्वनी सुविधांनी जोडणे व २०१२ पर्यंत सर्व पंचायत कार्यालयांना ब्रॉडबॅण्ड सुविधा पुरविणे.
- २००९ पर्यंत ६० लाख घरांची बांधणी करणे परंतु हे साध्य न झाल्याने हे लक्ष्य वाढवून २०१४ पर्यंत १.२० कोटी घरांची बांधणी करण्याचे ठरविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment