Friday 6 September 2013

G-20

भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्कस्तान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपीय महासंघ. या देशांच्या अर्थव्यवस्थांचे उत्पन्न हे सकल जागतिक उत्पन्नाच्या ८० टक्के असून, जगातील ८० टक्के व्यापार या देशांमध्ये होतो. तसेच, जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या या देशांमध्ये राहते.
यंदाची परिषद आठवी 
अगोदरच्या परिषदा वॉशिंग्टन, लंडन, पिट्सबर्ग, टोरांटो, सोल, केन्स आणि लॉस कॅबोस, येथे झाल्या होत्या. यंदाची परिषद आठवी असून, ती रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे होत आहे. 

यंदाच्या परिषदेची संकल्पना 
दर्जेदार रोजगार आणि गुंतवणूक, विश्वास, पारदर्शकता आणि प्रभावी नियंत्रण यांच्या साह्याने विकासाच्या नव्या चक्राची सुरुवात करणे हे यंदाच्या परिषदेचे उद्दिष्ट आहे. 

स्थापनेची पार्श्वभूमी आणि उद्देश
पूर्व आशियातील आर्थिक संकटानंतर १९९९मध्ये सर्वप्रथम ही संघटना स्थापन झाली. त्या वेळी सहभागी देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांच्यापुरताच या परिषदेतील सहभाग मर्यादित होता. २००८च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर जी-वीस देशांच्या गटाला जास्त महत्त्व प्राप्त झाले. तेव्हापासूनच परिषदांना सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी निगडित प्रश्नांबाबत चर्चा आणि सहकार्य हे या गटाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने सहभागी देशांच्या अर्थव्यवस्थांच्या धोरणांचा अभ्यास आणि आढावा घेण्यासाठी या गटाच्या परिषदा होतात. त्यामध्ये उच्चस्तरीय नेते सहभागी होतात.

No comments:

Post a Comment