Sunday 8 September 2013

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना -

जगातील सर्वात मोठा रोजगारनिर्मिती व उपजीविकेची संधी निर्माण करणारा हा कार्यक्रम आहे. केंद्र सरकारने ७ सप्टेंबर २००५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा केला व २ फेबुवारी २००६ पासून मनरेगा कायदय़ाची अंमलबजावणी सुरू केली. २ ऑक्टोबर २००९ मध्ये या योजनेचे नाव बदलून ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना’ असे करण्यात आले. ग्रामीण भागात, असंघटित कामगारांना उपजीविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून द्यावे, यासाठी या योजनेंतर्गत एका आíथक वर्षांत किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
वैशिष्टय़े -
- या कायद्यात कुटुंब हे एकक मानले जाते. या कायदय़ांतर्गत प्रत्येक कुटुंब हे संयुक्तरीत्या १०० दिवसांचा रोजगार प्राप्त करण्यास पात्र असते.
- कुटुंबातील प्रौढ अकुशल व्यक्तीने ग्रामपंचायतीकडे तोंडी अथवा लेखी अर्ज केल्यास त्यास किंवा त्या कुटुंबास रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो.
-काम मिळण्यासाठी ग्रामपंचायत अथवा गट कार्यालयात अर्ज केल्यानंतर १५ दिवसांच्या आत काम मिळणे बंधकारक असते.
- नावनोंदणी झाल्यानंतर व्यक्तीच्या वयाची आणि रहिवासाची पडताळणी केली जाते. नोंदणी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत रोजगारपत्र मिळणे बंधनकारक असते.
- अर्जदारास त्याच्या गावापासून पाच किमीच्या आतच रोजगार उपलब्ध करून द्यावा व जर काम हे पाच किमीपेक्षा जास्त अंतरावर असेल तर त्या व्यक्तीला १० टक्के जास्त भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- काम देताना स्त्रियांना प्राधान्य असावे. एकूण लाभधारकांपकी १/३ संख्या म्हणजे ३३ टक्के संख्या स्त्रियांची असावी.
- रोजगाराचा मोबदला हा दर आठवडय़ास कामगारांना प्रदान करण्यात यावा. मोबदला देण्यासाठी १५ दिवसांपेक्षा जास्त काळ लागू नये.
- या योजनेंतर्गत वेतन हे शासनाद्वारे, ग्राहक किंमत निर्देशांक - शेतमजूर (उढक-अछ) यानुसार निश्चित केले जाते.
- अकुशल कामगारांच्या १०० टक्के वेतनाची जबाबदारी ही केंद्र सरकारची असते. संपूर्ण प्रशासकीय खर्च हे केंद्र सरकार करते, अशी तरतूद या योजनेत आहे. तसेच कुशल कामगार व साहित्यावरील ७५ टक्के खर्च केंद्र सरकार उचलतो व उर्वरित रक्कम ही संबंधित राज्याची जबाबदारी असते. एकूण निधीपकी रोजगारावर ६० टक्के व साहित्यावर ४० टक्के अशी रक्कम खर्च केली जाते. जर वरील विभागणीचा विचार केल्यास २५ टक्के निधी राज्य सरकारच्या वाटय़ाला येतो तर ७५ टक्के निधी केंद्र सरकारच्या वाटय़ाला येतो.
- या योजनेमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी योजनेतील कार्यक्रमाचे ग्रामसभांमार्फत सामाजिक लेखापरीक्षण केले जाते, या योजनेंतर्गत झालेला खर्च, संपूर्ण नोंदी जनतेकरिता उपलब्ध करून दिल्या जातात.
- या योजनेंतर्गत जलसंवर्धन, जलसिंचन, कालवे, फळ लागवड, जमीन सुधारणा, पारंपरिक जलसाठय़ांचे नूतनीकरण, ग्रामीण रस्ते जोडणी, वनीकरण इ. कामे केली जातात.
- जर नोंदणीनंतर १५ दिवसांच्या काळात रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही, तेव्हा लाभधारकास बेरोजगारी भत्ता दिला जातो.

No comments:

Post a Comment