Tuesday, 7 May 2013

एमपीएससी : पूर्वपरीक्षा ओळख



Article from LOKSATTA

आकलनक्षमता (Comprehension)- आयोगाने पेपर-२ च्या अभ्यासक्रमात या विषयास पहिले स्थान दिले आहे. या घटकाचा उद्देश हा उमेदवाराची आकलनक्षमता किंवा कौशल्य तपासणे हा आहे.
एखादा उतारा देऊन त्यावरील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधणे असे या घटकाचे स्वरूप असण्याची शक्यता आहे. यामध्ये मराठीतील प्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकातील किंवा ग्रंथातील उतारा, सध्या चर्चेत असलेले सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक प्रश्न यासंबंधी उतारे येणे अपेक्षित आहे. हे उतारे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत (Translation) असतील. कारण या उताऱ्यातून विद्यार्थ्यांची भाषिक क्षमतेबरोबरच आकलनक्षमतेचीही कसोटी लागणार आहे.
आयोगाने या पेपरच्या अभ्यासक्रमाच्या सातव्या घटकात मराठीत व इंग्रजी भाषेची आकलनक्षमता किंवा कौशल्य (Marathi and English Language comprehension skill)) चा उल्लेख केला आहे. या घटकातील उताऱ्यांचे भाषांतर विद्यार्थ्यांना उपलब्ध नसेल तर मराठी व इंग्रजी उताऱ्यांवरून भाषिक आकलनक्षमता तपासणे हा या घटकाचा उद्देश असल्याचे दिसून येते.
या दोन्ही घटकांची तयारी करताना उताऱ्याचे सूक्ष्मपणे वाचन करणे गरजेचे ठरते. उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्यावरील प्रश्नांमधील मुख्य शब्द व प्रश्नांचा रोख समजून घेणे आवश्यक आहे. या घटकांतून विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता तसेच आकलनक्षमता जाणण्याचा उद्देश आहे हे लक्षात घेणे गरजेचे ठरते.
आयोगाने पेपर-२ मध्ये दुसऱ्या घटकात आंतरवैयक्तिक कौशल्य व संप्रेषण किंवा संभाषणकौशल्य (Interpersonal skills including communication skills) या विषयाला स्थान दिले आहे. प्रशासनात काम करत असताना संवाद समन्वय महत्त्वाचा असतो. त्यासाठी संभाषणकौशल्य हा घटक महत्त्वाचा ठरतो.
एका प्रकारे या घटकातून उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेण्याचा उद्देश स्पष्ट होतो. या घटकाची तयारी करताना शब्दसामथ्र्य, समानअर्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, प्रशासकीय भाषेतील महत्त्वाचे शब्द याकडे विशेष लक्ष द्यावे. उदा. ज्ञापन, अधिसूचना, श्वेतपत्रिका, इ.बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय एखादा लघु उतारा हा चार विधानांच्या स्वरूपात देण्यात येतो व त्या विधानांची क्रमवार पद्धतीने अर्थपूर्णरीत्या जुळणी करणे असे प्रश्नांचे स्वरूप असते. हे प्रश्नही बहुपर्यायी व वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. या प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी लेखनातून संवाद साधण्याची क्षमता किंवा कौशल्य तपासणे हा मुख्य हेतू असतो. त्यावरून चार पर्यायांच्या स्वरूपात विधाने दिली जातात. ही विधाने किंवा पर्याय त्या उताऱ्याशी सुसंगत आहेत की विसंगत आहेत हे पर्यायातून निवडावे लागते.
आयोगाने 'तार्किक व विश्लेषणात्मक क्षमता' (Logical reasoning and analytical ability)) या विषयाला तिसरे
स्थान दिले आहे. तर चौथ्या स्थानावर निर्णयक्षमता व समस्यांचे निराकरण किंवा सोडवणूक (Decision making and problem- solving)) हा विषय आहे. हे दोन्ही घटक एकमेकांना पूरक आहेत. या दोन्ही घटकांतही उताऱ्यावरील प्रश्नांना महत्त्वाचे स्थान असते. तसेच दोन किंवा चार विधाने दिलेली असतात व त्या दोन विधानांतील संबंध, कारण व निष्कर्ष अशा स्वरूपाचे असतात. विद्यार्थ्यांनी पर्यायातून योग्य कारण किंवा निष्कर्ष निवडायचे असतात. या घटकात नातेसंबंध, दिशा, कूटप्रश्न (कोडी), संभाव्यता (Probablity) संख्या व अक्षरांचे एकमेकांशी असलेले संबंध, भूमितीय आकृत्या या घटकांवर प्रश्न विचारले जातात.
निर्णयक्षमता व समस्यांशी सोडवणूक या घटकात एखादा प्रसंग किंवा घटना देण्यात येते व त्या प्रसंगी तुम्ही कोणता निर्णय घेता या संदर्भात प्रश्न विचारले जातात. यातून विद्यार्थ्यांची निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाते.
आयोगाने पाचव्या व सहाव्या स्थानावर अनुक्रमे सामान्य बुद्धिमत्ता चाचणी (General mental ability) व मूलभूत संख्याज्ञान व सामग्रीचे आकलन व उपलब्धता (Basic numeracy Data interpretation sufficiency) या घटकांना स्थान दिले आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या जुन्या अभ्यासक्रमातील बुद्धिमापक चाचणी या घटकाचे स्वरूप वरील दोन घटकांच्या स्वरूपासारखेच आहे. नव्या अभ्यासक्रमात सामग्रीचे आकलन व उपलब्धता या नवीन घटकाचा समावेश केलेला आहे. तक्ते, आलेख, स्तंभालेख, वृत्तालेख यावरून प्रश्न विचारले जातात. या विषयाद्वारे माहितीचे संकलन, व्यवस्था योग्य प्रकारे कशी केली जाते, हे विद्यार्थ्यांना समजावे हा हेतू असतो. आजच्या लेखात पेपर-२ ची पूर्वतयारी व स्वरूप या विषयीची आपण चर्चा केली. आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात जो बदल केला आहे, त्याने गोंधळून न जाता संयमाने या बदलांचा स्वीकार करून नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे. मागील दोन लेखांमध्ये बदललेल्या अभ्यासक्रमाच्या पूर्वतयारीची चर्चा आपण केली. या अभ्यासक्रमावर संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अभ्यासक्रमाचा प्रभाव स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पूर्वतयारी करताना यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या मागली दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेऊन राज्यसेवा पूर्वपरीक्षेची पूर्वतयारी त्या अनुषंगाने करावी, हे श्रेयस्कर ठरेल. विद्यार्थ्यांना या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा!

राज्यसेवा पूर्वपरीक्षेची अंतिम तयारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १८ मे रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी अभ्यासाचे हे कानमंत्र. आपला अभ्यास नेमका किती झाला आहे, काही जोखून या परीक्षेला आत्मविश्वासाने कसे सामोरे जाता येईल, यासंबंधीच्या टिप्स..
पूर्व परीक्षा सोपी आणि मुख्य अवघड किंवा पूर्व परीक्षा अवघड असेल तर मुख्य परीक्षा जास्त अवघड असेल, असे कोणतेही गणित मांडून अभ्यासाची रणनीती ठरवू नका. काही बहाद्दर विद्यार्थी मित्रांनी अभ्यास नियोजन करताना असाही विचार मांडतात की, अभ्यास चांगला, बरा कसाही झाला तरी वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या परीक्षा पद्धतीमुळे दिलेल्या चार उत्तरात एक 'बरोबर उत्तर' समोर असणारच आहे. त्यामुळे प्रसंगी नशिबाची साथ घेऊन आम्ही एखादा पर्याय निवडून उत्तराला काळे करूच! मित्रांनो, नशिबाचा आजवर कोणत्याही तत्त्ववेत्त्याने, विचारवंताने, संशोधकानेही नाकारलेले नाही. मात्र, नशिबाविषयी चर्चा करण्यापूर्वी येत्या १८ मे रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेच्या एकूण स्पध्रेचा अंदाज घेऊया.
पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतील. प्रश्नांसोबत चार उत्तरांचे पर्याय तुमच्यासमोर असतील. तुमचा अभ्यास कसा आणि किती चांगला झाला आहे, स्पध्रेत तुम्ही नेमके कुठे आहात, हे जाणण्यासाठी खालील पाच टप्प्यांच्या फूट पट्टीवर तुमचा अभ्यास, तयारी पडताळून पाहा.
- प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाचल्यानंतर उत्तरांचे पर्याय पाहाण्यापूर्वीच पटकन तुम्हाला उत्तर आठवत असेल तर तुमचा अभ्यास उत्तम सुरू आहे, असे समजा.
- प्रश्न वाचल्यानंतर उत्तरांचा पर्याय पाहाताक्षणीच तुम्ही अचूक उत्तर आत्मविश्वासाने निवडलंत, तर तुमचा अभ्यास उत्तम सुरू आहे.
- प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही उत्तरांचे पर्याय पाहण्यासाठी उतावीळ असता. कारण तुम्ही या विषयाचा अभ्यास केलेला असतो. त्यामुळे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकू, असा विश्वास तुम्हांला वाटत असतो. कदाचित, स्मरणशक्ती धोका देण्याची शक्यता तुम्हांला वाटत असते. उत्तरांचे पर्याय वाचल्यानंतर चार पर्यायांपकी चुकीचे दोन पर्याय तुमच्या लक्षातही येतात. मात्र, उर्वरित दोन पर्यायांमध्ये तुम्ही गोंधळता आणि जर अचूक उत्तराच्या पर्यायापर्यंत पोहोचण्यात तुमची जर दमछाक होत असेल, तर समजा तुम्हांला अजून अभ्यासाचा बराच पल्ला गाठायचा आहे.
पूर्व परीक्षेत बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न वाचल्यानंतर उत्तर आठवले, हे तथ्यात्मक प्रश्नाबाबत ठीक आहे. पण बहुविधानी प्रश्न मूलभूत तपशील विचारणारे असतात. परिणामी, प्रत्येक प्रश्न व्यवस्थित किमान दोन वेळा वाचा आणि तितक्याच दक्षतेने उत्तरांचे पर्याय वाचून निवडा.
यापूर्वी पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची आणि मुख्य परीक्षा दीघरेत्तरी स्वरूपाची होती. त्यामुळे अशा परीक्षा पद्धतीला अनुरूप अभ्यास पद्धतीचा अवलंब केला जायचा. वस्तुनिष्ठ स्वरूपात अचूकतेला जास्त महत्त्व असते. विषय घटक वाचताना अधोरेखित करून, वारंवार उजळणीचे तंत्र वापरावे लागते. वस्तुनिष्ठ प्रश्नसंचाचा (question bank) भरपूर सराव करावा लागतो.
पूर्व आणि मुख्य दोन्ही स्तरांवर वस्तुनिष्ठ प्रश्नपद्धती आहे. शिवाय प्रश्नांचे स्वरूप तथ्यात्मक, संकल्पनात्मक आणि बहुविधानी असे असणार आहे. त्यामुळे मूलभूत अभ्यास दोन्हीकडे तितकाच महत्त्वाचा आहे.
नियोजनबद्ध तयारीचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे वेळेचे नियोजन. पूर्व परीक्षा पेपर क्र. १ व पेपर क्र. २ प्रश्नपत्रिकांची प्रश्नसंख्या व पेपर सोडविण्यासाठीचा निर्धारित वेळ याचा मेळ घालून अभ्यासाची तयारी करावी लागेल. साधारण एका प्रश्नाला किती वेळ मिळतो, हे तपासून पाहा. सामान्य अध्ययन पेपर १चे घटक विषय, प्रश्नांचे स्वरूप आणि पेपर २ कल चाचणीचे घटक विषय, प्रश्नांचे भिन्न स्वरूप पाहाता वेळेच्या व्यवस्थापनाचे गणित सोडवावेच लागेल.
स्पर्धा परीक्षा तयारीशी सबंध नसणाऱ्या कोणत्याही विद्याशाखेच्या नवख्या विद्यार्थ्यांला, पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवायला द्या, अभ्यास असेल वा नसेल, गंमत म्हणून अंदाजाचा नेम धरून पेपर सोडविला तरी त्याची काही उत्तरे ही बरोबर येतील. 'यात विशेष ते काय, यूपीएससी/एमपीएससी परीक्षा सोपी असते,' असेही तो हिरीरीने सांगेल. पण घरच्या हॉलमधील सोफ्यावर बसून गंमत म्हणून पेपर सोडवणे आणि खूप अभ्यास करून ध्येय नजरेसमोर ठेवून परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवणे यात जमीन-अस्मानचा फरक आहे. परीक्षा हॉलमधील तणावाचे व्यवस्थापन करीत प्रश्नपत्रिका सोडविण्यात खरी परीक्षा असते. परीक्षेचे यश हे अभ्यासात आणि अधिकाधिक अभ्यासात असते.
आपल्या राज्यात एमपीएससीचा अभ्यास करणारे उमेदवार पूर्ण वेळ पीएसआय, एसटीआय आणि राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करायचे. पकी मोजकेच उमेदवार यूपीएससीचासुद्धा अभ्यास करायचे. नागरी सेवा परीक्षेचा (यूपीएससी) अभ्यास करणाऱ्या राज्यातील उमेदवारांपकी मोजके विद्यार्थी एमपीएससी परीक्षा द्यायचे. यूपीएससीचा अभ्यास करणारे बहुतांश उमेदवार एमपीएससीच्या परीक्षेला बसायचे. पूर्ण वेळ एमपीएससी करणारे वेगळे आणि पूर्णवेळ यूपीएससी करणारे वेगळे अशी स्पष्ट विभागणी यापूर्वी होती. यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही परीक्षांचा गांभीर्याने अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण कमी होते. इथून पुढे हे चित्र बदलेल.
राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेचा पॅटर्न बदलला. नागरी सेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जसाच्या तसा 'कॉपी-पेस्ट' केला. या अभ्यासक्रमात केवळ 'महाराष्ट्र' जोडला गेला आहे. राज्य लोकसेवा आयोगाची ही भूमिका कौतुकास व अभिनंदनास पात्र आहे. या बदलाकडे परीक्षेचा 'पॅटर्न बदल' म्हणून न बघता हा बदल नजीकच्या काळात क्रांतिकारी बदल घडवेल, असा आहे. याचे कारण की, राज्य आणि केंद्र अशा दोन्ही पूर्व परीक्षांचा अभ्यास समान पातळीवर आल्यामुळे नागरी सेवा परीक्षा (यूपीएससी)ची तयारी करणारे सर्व उमेदवार आता एमपीएससीची परीक्षाही देतील. पूर्णवेळ यूपीएससी करणाऱ्या उमेदवारांसाठी 'एमपीएससी'ने एक नवी संधी निर्माण केली आहे. काही उमेदवारांसाठी ही 'नवी संधी' निर्माण झाली असली तरी दुसरीकडे एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी 'नवी स्पर्धा' निर्माण झाली आहे.
थोडक्यात, आता स्पर्धा वाढली आहे. सामोरी येणारी कोणतीही स्पर्धा सोबत अपयशाची पायरी नव्हे तर संधीचे नवे अवकाश आणि सुप्त क्षमतांसाठी नवी वाट घेऊन येते. म्हणून स्पध्रेला पर्याय म्हणजे अभ्यास आणि अभ्यासाला पर्याय म्हणजे जास्त अभ्यास.
पूर्वपरीक्षेसाठी शुभेच्छा !

Sunday, 5 May 2013

Drug resistant Tuberculosis (TB)


Tuberculosis, MTB, or TB (short for tubercle bacillus) is a common, and in many cases lethal, infectious disease caused by various strains of mycobacteria, usually Mycobacterium tuberculosis.
Tuberculosis typically attacks the lungs, but can also affect other parts of the body. 
It is spread through the air when people who have an active TB infection cough, sneeze, or otherwise transmit respiratory fluids through the air.
Tuberculosis or TB remains a significant health problem in Asia and Africa causing extensive human suffering and loss of life.
In recent years the causative bacteria has become resistant to available anti-TB drugs. 
The resistance can be of various levels, such as MDR or multi-drug resistant TB, when the most commonly used drugs rifampicin and isoniazid become ineffective. 
It becomes difficult to treat XDR or extensively drug resistant TB where the bacteria become resistant not only to these two drugs but also injectable and other second-line drugs.
According to the World Health Organisation’s Global TB report 2012, India, China, Russia and South Africa have almost 60% of the world’s MDR-TB burden.
There are multiple causes of drug resistance TB.
  • poor management of TB treatment which includes inconsistent or partial treatment, 
  • prescription of incorrect treatment regimens or an unreliable or erratic supply of drugs. ,
  • The use of spurious serology based diagnostic tests leading to inaccurate diagnosis is also an important contributing factor.
In recent years, the government has made a conscious effort to scale up DOTS Plus services i.e. a specialized strategy that focuses on drug resistant TB and is now available across 35 States in India. Introduction of newer diagnostic tests such as Xpert MTB/RIF which can detect MDR-TB from the sample as well as resistance to rifampicin, a surrogate marker for MDR-TB, in less than two hours has become important to rapidly diagnose MDR-TB.

Thursday, 2 May 2013

Ultra MEGA Power Projects in INDIA

  • Ultra Mega Power Projects (UMPP) are a series of ambitious power projects planned by the Government of India. 
  • The Ultra Mega Power projects, each with a capacity of 4000 MW or above
  • The UMPPs are seen as an expansion of the MPP (Mega Power Projects) projects
  • The first UMPP, developed by Tata Power at Mundra, Gujarat has been commissioned and contributes 4,000 MW in power to the northern grid.
  • Ultra MEGA Power Projects in INDIA are:
  1. Mundra - Gujarat
  2. Sasan - Madhya Pradesh
  3. Krishnapatnam - Andhra Pradesh
  4. Tilaiya - Jharkhand

Advance Reservation Period for Booking Reserved Train Tickets Reduced to 60 Days


  • With effect from 01.05.2013, the ARP will be of 60 days (excluding the day of journey).
  • Cancellation of the booking made beyond the ARP of 60 days will, however, be permitted. 
  • There will be no change in the case of certain day time express trains like Taj Express, Gomti Express etc. where lower time limits for advance reservations are at present in force. 
  • There will also be no change in the case of limit of 360 days for foreign tourists.