Tuesday, 7 May 2013

मुलाखतीची तयारी

लेखी परीक्षांचे अडथळे पार केल्यानंतर मुलाखतीला सामोरे जाताना व्यक्तिगत माहिती संदर्भातील प्रश्न जसे महत्त्वाचे असतात, तसेच भोवताली घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांविषयीचे उमेदवाराचे मत व भूमिकाही महत्त्वाची ठरते. स्पर्धापरीक्षेतील मुलाखतीची तयारी कशी करावी, याविषयी..

मुलाखत हा केंद्र लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील शेवटचा आणि महत्त्वपूर्ण टप्पा असतो. उमेदवाराचे अंतिम यादीतील स्थान निश्चित करण्यात हा टप्पा निर्णायक ठरू शकतो. म्हणूनच यात जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवणे अत्यावश्यक आहे. यूपीएससीने २७५ गुणांसाठी तर एमपीएससीने १०० गुणांसाठी मुलाखतीचा अंतिम टप्पा निर्धारित केलेला आहे. लोकसेवा आयोगाने मुलाखतीस 'व्यक्तिमत्त्व चाचणी' असे संबोधले आहे. मुलाखतीचा हेतू उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व सनदी सेवा पदासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करणे होय. व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे मुलाखतीमध्ये विचारात घेतली जातात. व्यापक अर्थाने मुलाखतीत उमेदवाराच्या ज्ञानाची कसोटी घेतली जाते, असे नाही तर आपल्या भोवताली घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी याविषयी उमेदवाराची भूमिका व मत काय आहे, याची तपासणी केली जाते.
मुलाखत मंडळातील अनोळखी सभासदांसमोर तुम्ही किती सहजपणे वागू शकता आणि स्वतला किती आत्मविश्वासपूर्वक सादर करू शकता, याची चाचणी मुलाखती दरम्यान होत असते. तुमच्या सभोवती घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांबाबत तुम्हाला माहिती आहे का? जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांमधील विविधांगी वास्तवाशी तुम्ही किती परिचित आहात? या घडणाऱ्या घटनांसंबंधी तुम्हाला मत आहे का? त्याचे स्वरूप काय? या माहितीच्या आधारावर तुमची सर्वसाधारण जाणीव कशी आहे, हे मुलाखती दरम्यान बघितले जाते. एकंदर उमेदवाराची स्पष्ट व ताíकक विचार करण्याची क्षमता, मत व्यक्त करण्यातील समतोल, आवडीच्या गोष्टीमधील सखोलता आणि महत्त्वपूर्ण विषयांसंदर्भातील ज्ञान याबरोबरच त्याचा आत्मविश्वास, निर्णयक्षमता, आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्याची क्षमता इ. गुणवैशिष्टय़े तपासली जातात.
मुलाखत मंडळ
मुलाखतीसाठी मुलाखत मंडळामध्ये आयोगाचे अध्यक्ष/ज्येष्ठ सदस्य + वरिष्ठ अधिकारी (पोलीस/इतर खाती)/सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ प्राध्यापक असतात. मुलाखतीविषयी विद्यार्थ्यांमध्ये पुष्कळ पूर्वग्रह दिसून येतात. ते असे की, उत्तम शैक्षणिक आलेख असले तरच चांगले गुण मिळतात. मुलाखत मंडळ हे जणू सापळाच रचून बसलेले असते. मुलाखत मंडळाने विचारलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे यायला हवीत. अस्खलित इंग्रजीत संवाद साधल्यासच चांगले गुण मिळतात. मुलाखतीसाठी वशिला लावावा लागतो. अशा एक ना अनेक शंकाकुशंका स्पर्धकांच्या मनात घर करून असतात. म्हणूनच कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय मुलाखतीला सामोरे जाणे हा गुण मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मुलाखत मंडळे ही कोणाशीही पूर्वग्रहाने वागत नसतात. कारण त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक स्पर्धक असता.
'मुलाखत' याचा शब्दश: अर्थ म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समोरासमोर खुले करणे. मुलाखतीमध्ये विषयातील ज्ञानाऐवजी उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेतली जाते. व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे मुलाखतीमध्ये विचारात घेतली जातात. मुलाखतीद्वारे उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुलाखतीचा नेमका अभ्यास करताना स्वतच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पलू सादर करणे आवश्यक ठरते.
मुलाखतीतील घटक
उमेदवाराला मुलाखतीची तयारी करताना पुढील घटकांचा सविस्तर अभ्यास करावा लागतो. यातील विशेषत वैयक्तिक माहिती, पदांचा पसंतीक्रम, पदवीचा विषय, त्याचा दैनंदिन जीवनातील वापर, छंद, नोकरीचा अनुभव आणि भोवताली घडणाऱ्या घडामोडी या घटकांची पुढीलप्रमाणे तयारी करावी लागते-
(१) व्यक्तिगत माहिती - मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना उमेदवाराला आपली संपूर्ण व्यक्तिगत माहिती नमूद करावी लागते. हा 'बायोडाटा'च पायाभूत मानून त्यातील प्रत्येक घटकाची तयारी करावी. यात उमेदवाराचे स्वतचे नाव, आई-वडिलांचे नाव आणि आडनावासंबंधी माहिती संकलित करावी. आपल्या नावाचा विशिष्ट अर्थ असल्यास तो लक्षात घ्यावा. तसेच आपल्या नावाची एखादी व्यक्ती इतर क्षेत्रात सुप्रसिद्ध असल्यास तिच्याविषयी थोडक्यात माहिती संकलित करावी.
(२) वास्तव्य - विद्यार्थ्यांनी मूळ ठिकाण, सध्याचे ठिकाण, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य असे वर्गीकरण करावे. यातील प्रत्येक घटकाचा थोडक्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राजकारण, अर्थकारण, इतर काही महत्त्वाची वैशिष्टय़े यासंबंधी तयारी करणे अत्यावश्यक ठरते.
(३) शैक्षणिक पाश्र्वभूमी - उमेदवाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी हा आणखी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. यात अगदी शालेय शिक्षणापासून, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, महाविद्यालयीन आणि पदवी-पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची माहिती निर्णायक ठरते. विशेषत: पदवी शिक्षण आणि त्यातील विशेषत्व ही बाब महत्त्वाची मानावी. ज्या शाखेत आणि विषयात पदवी संपादन केली आहे त्यातील पायाभूत संकल्पना, विचार आणि उपयोजनात्मक भाग यावर लक्ष केंद्रित करावे. शिक्षण संस्थांची नावे आणि ठिकाणे यासंबंधीदेखील प्रश्न विचारले जाऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यासंबंधीही माहिती प्राप्त करावी.
(४) अभ्यासबाह्य़ गोष्टींमधील रस - उमेदवाराच्या व्यक्तिगत माहितीतील 'अभ्यासबाह्य़ बाबींतील रस' हा घटकही महत्त्वपूर्ण ठरतो. यात विद्यार्थ्यांचा छंद, क्रीडा प्रकारातील रस, विविध स्पर्धात प्राप्त केलेली पारितोषिके, बक्षिसे अशा अभ्यासबाह्य़ घटकांचा समावेश होतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने या घटकाची प्रभावी तयारी करणे मध्यवर्ती ठरते. अशा रीतीने उपरोक्त विविध घटकांची सविस्तर माहिती संकलित करून त्यावर आधारित अधिकाधिक 'मॉक इंटरव्ह्य़ू'चा सराव केल्यास अधिक गुण मिळवता येतील.
(५) वैकल्पिक विषय - यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी उमेदवाराने निवडलेल्या वैकल्पिक विषयासंदर्भात देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या विषयातील संकल्पना, विचार-सिद्धांत, विचारवंत, समकालीन आयाम इत्यादी घटकांचा अभ्यास करावा.
(६) चालू घडामोडींविषयी माहिती - आपल्या भोवताली घडणाऱ्या चालू घडामोडींविषयीही अनेक प्रश्न विचारले जातात. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळी आणि सामाजिक, राजकीय, आíथक, सांस्कृतिक, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा अशी विभागणी करून त्यासंबंधी महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर तयारी करावी. चच्रेतील मुद्दय़ांचे स्वरूप, कारणे, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, संभाव्य उपाय इ. आयामांसंबंधी तयारी करावी. संबंधित मुद्दय़ांविषयी जी प्रचलित मतमतांतरे आहेत, त्याची माहिती उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या, कळीच्या मुद्दय़ांविषयी स्वत:चे मत असणे महत्त्वाचे ठरते.
(७) पदांचा पसंतीक्रम - पदांच्या पसंतीक्रमाबाबत योग्य स्पष्टीकरण देता यावे. आपले व्यक्तिमत्त्व व आजूबाजूची परिस्थिती यांची आपल्या पसंतीक्रमाशी सांगड घालता आली पाहिजे. अर्थात यावेळीसुद्धा यशस्वी उमेदवारांनी दिलेल्या उत्तरांची पुनरावृत्ती करण्याचा मोह टाळावा. 'आपले पूर्वायुष्य व आलेले अनुभव यातून प्रशासकीय अधिकारी बनण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली,' नेमक्या या कारणांचा समावेश आपल्या उत्तरात असावा. दिलेल्या पसंतीक्रमांतील पदांची नेमकी माहिती, त्यांचे अधिकार, कर्तव्य, प्रशासनातील त्या पदाची नेमकी भूमिका याबाबत आपणास प्रश्नांना सामोरे जावे लागते. या पदांशी संबंधित सामाजिक व प्रचलित घडामोडींचे ज्ञान अपेक्षित असते.
(८) नोकरीविषयक माहिती - एखादा उमेदवार नोकरी करत असल्यास त्याविषयक सविस्तर तयारी करणे अत्यावश्यक ठरते. नोकरीचे कार्यक्षेत्र, पदाची काय्रे व जबाबदारी, त्यासंबंधी तांत्रिक माहिती, त्यातील समस्या व आव्हाने आणि उपाययोजना या बाजूंबरोबरच नोकरीचा एकंदर अनुभव याविषयी नेमका अभ्यास करणे गरजेचे ठरते.
प्रत्यक्ष मुलाखतीस जाताना
मुलाखतीची संकल्पना आणि मुलाखतीची तयारी करताना विचारात घ्याव्या लागणाऱ्या बाबी पाहिल्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीस कशाप्रकारे सामोरे जावे, याबाबत चर्चा करता येईल. मुलाखतीस प्रत्यक्षपणे सामोरे जाताना पुढील गोष्टींकडे आवर्जून लक्ष पुरवावे.
प्रथम गोष्ट म्हणजे तुमचा पेहराव. कारण त्यावरून तुमची आवडनिवड, आचारविचार समजत असतात. तेव्हा पोषाख हा औपचारिक, साधा मात्र नीटनेटका असावा. स्वच्छ, इस्त्री केलेला व स्वत:स शोभून दिसणारा असावा. मुलांनी शक्यतो शर्ट-पँट व टाय तर मुलींनी सलवार-कमीज अथवा साडी परिधान करावी. आपण कोणत्याही समारंभाला चाललेलो नाही, याचे भान ठेवून सौंदर्यप्रसाधनांचा कमीत कमी वापर करावा.
(२) दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही धावपळ होऊ नये, म्हणून मुलाखतीच्या नियोजित वेळेआधी नियोजित जागेवर पोहोचावे. मुलाखतपत्रात वेळ दिलेली असते, तेव्हा तत्पूर्वी तुम्ही तेथे हजर
राहा.
(३) जेव्हा तुम्ही मुलाखत कक्षात पोहोचाल तेव्हा कितीही काळजी, चिंता वाटत असली तरी आपल्या भावनांवर ताबा ठेवा, शांत राहण्याचा प्रयत्न करा व सर्वाना अभिवादन करा. जेव्हा तुम्हाला बसण्यास सूचित करण्यात येईल, तेव्हा बसा. कारण तुमची मुलाखत काही उभी राहून घेतली जाणार नाही, तेव्हा शांत राहा.
(४) तुम्ही शांत राहण्यासोबतच आत्मविश्वासानेही बोला. मुलाखत मंडळ तुम्हाला काही बाहेर काढण्यासाठी नव्हे तर तुमची निवड करण्यासाठी तेथे बसलेले असते. जर तुम्ही आत्मविश्वासाने उत्तरे देत असाल तर त्याचा नक्कीच अनुकूल प्रभाव पडत असतो.
(५) उत्तरे देताना मुलाखत मंडळातील सर्वाकडे पाहून उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.
(६) तुमच्या आत्मविश्वासाबरोबर नम्रपणाही दिसून येणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही नजरेत नजर घालून उत्तरे द्याल तेव्हा तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. त्याचप्रमाणे तुमच्या उत्तर देण्याच्या पद्धतीवरूनदेखील तुमचा नम्रपणा जोखता येतो.
(७) मुलाखत मंडळाच्या सदस्यांचा आदर राखा. त्यांच्या अनुभवाचा मान राखा व उलट
उत्तरे देऊ नका. अथवा उलट प्रश्न विचारू नका, शिवाय संलग्न अथवा अतिशयोक्त उत्तरे देऊ नका. जर माहिती नसेल तर
तसे स्पष्ट सांगा, मात्र चुकीची माहिती
देऊ नका. अन्यथा त्याचा नकारात्मक परिणाम संपूर्ण मुलाखती दरम्यान दिसून येऊ शकतो.
(८) तुमच्या उत्तरासोबत तुमचा आवाजही तितकाच महत्त्वाचा असतो. सहजपणे व स्पष्टपणे ऐकू जाईल अशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करा. अर्थात तुमच्या बोलण्यात ठामपणा व निर्धार असावा.
मुलाखतीत स्वत:च्या व्यक्तिगत माहितीतून निर्माण होणारे प्रश्न जसे महत्त्वाचे असतात,
तसेच भोवताली घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांविषयीचे उमेदवाराचे मत व भूमिकाही महत्त्वाची ठरते. भारतीय राज्यघटना, प्रशासनाची चौकट आणि आपल्या समाजातील सामाजिक, आíथक वास्तव यांचे भान ठेवूनच उमेदवाराने मुलाखत मंडळासमोर आपले व्यक्तिमत्त्व सादर करणे अपेक्षित असते. प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, जिज्ञासा, प्रतिसाद, आत्मविश्वास, निर्णय-निर्धारण क्षमता आणि हजरजबाबीपणा अशा महत्त्वाच्या गुण वैशिष्टय़ांची तपासणी म्हणजे 'व्यक्तिमत्त्व चाचणी होय' हे लक्षात घेऊनच उमेदवाराने मुलाखतीच्या तयारीची रणनीती आखावी.

the article is from LOKSATTA

यू.पी.एस.सी. आणि पूर्वपरीक्षा

अखिल भारतीय स्पर्धापरीक्षेच्या पूर्वपरीक्षेचे स्वरूप २०११ सालापासून बदललेले आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पूर्वपरीक्षेला प्रत्येकी २०० गुणांसाठी दोन पेपर असतात. पूर्वपरीक्षा ही फक्त प्राथमिक फेरी आहे. यातील गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी धरले जात नाहीत. जरी पूर्वपरीक्षेचे मार्क्‍स अंतिम गुणवत्ता यादीसाठी धरले जात नसले तरी पूर्वपरीक्षेचे महत्त्व कमी होत नाही. कारण जर तुम्ही पूर्वपरीक्षा पास झाला नाहीत, तर मुख्य परीक्षेचा कितीही अभ्यास झाला असेल तरी तुम्हाला संधी मिळत नाही, म्हणून पूर्वपरीक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे.
२०११ पूर्वी जनरल स्टडीजचा एक पेपर व वैकल्पिक विषयांचा एक पेपर असे दोन पेपर असत. त्यातही वैकल्पिक विषयाला जास्त महत्त्व होते. बऱ्याच वेळा घोकंपट्टी करून परीक्षेत पास होणे सोपे होते. मात्र 'होता समिती आणि अलघ समिती' व या समित्यांसमोर मांडलेल्या अनेक तज्ज्ञांच्या मतानुसार पूर्वपरीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले. कारण फक्त पाठांतरापेक्षा प्रशासनातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आवश्यक गुण, कौशल्य तसेच चारित्र्याची कसोटी लागावी व युवकांची निवड व्हावी असे तज्ज्ञांनी मत मांडले होते. पूर्वपरीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, अशी टीका बऱ्याच वेळा वाचायला येते. मात्र ते चुकीचे आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि प्रत्येकाने काळानुरूप बदलले पाहिजे व या बदलाचे आपण स्वागतही केले पाहिजे. यामुळे ग्रामीण भारतातील व गरीब विद्यार्थ्यांचा फायदाच झाला आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात जास्त फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा झाला आहे. कारण जुन्या अभ्यासक्रमात एक वैकल्पिक विषय निवडायचा असल्याने, त्याचे संदर्भग्रंथ, त्या विषयाच्या नोट्स (घोकंपट्टीसाठी) उपलब्ध व्हायला थोडी अडचण व्हायची. त्यातही महाराष्ट्रातील पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम इतर राज्यांच्या तुलनेत या परीक्षांसाठी अजिबात सुसंगत नव्हता. या वैकल्पिक विषयांच्या जागी आलेल्या नवीन अभ्यासक्रमात सी-सॅट-२ (सिव्हिल सव्‍‌र्हिसेस अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट - पेपर २ ) मुळे विद्यार्थ्यांचे काम जास्त सोपे झाले, कारण येथे पाठांतराला कोणतेही स्थान नाही. मूलभूत संकल्पना तुम्हाला समजल्या असतील व तुम्ही मनापासून सराव केला असेल तर एकलव्याप्रमाणे आपणही या पेपरवर प्रभुत्व मिळवू शकता. या पेपरमुळे ज्यांचे गणित चांगले आहे, ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि विज्ञान विषयक शैक्षणिक पाश्र्वभूमी असेल, त्यांनाच याचा जास्त फायदा आहे, अशी टीका केली जाते. मात्र, वस्तुस्थिती त्याहून वेगळी आहे. जर यूपीएससी २०१२ च्या पूर्वपरीक्षेचा पेपर पाहिला तर फक्त ४ ते ५ प्रश्न गणिताशी, त्यातही प्राथमिक स्वरूपातील म्हणजे जे गणित दहावीपर्यंत शिकलो त्याशी संबंधित होते. यामुळेच, विनाकारण गणित व इंग्रजीचा बागोलबुवा करून घेऊ नये.
मागच्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेदेखील आपल्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बदलला. त्यामुळे आता यूपीएससी व एमपीएससी या पूर्वपरीक्षांचा अभ्यासक्रम आता सारखाच झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना एकाच अभ्यासक्रमाच्या जोरावर दोन्ही परीक्षा देणे सोपे होणार आहे.
सर्वप्रथम आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेऊ या-
सी-सॅट पेपर १, वेळ २ तास व २०० गुण
१) राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी
२) भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
३) भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आíथक भूगोल
४) भारतीय राज्यसंस्था व प्रशासन, संविधान व राजकीय व्यवस्था इ.
५) आíथक आणि सामाजिक विकास - निरंतर विकास, दारिद्रय़, लोकसंख्या शास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इ.
६) वातावरणीय परिस्थितिकी, जैवविविधता हवामान बदल यासंबंधी सामान्य मुद्दे, ज्याला विषयाच्या विशेष ज्ञानाची आवश्यकता नाही.
७) सामान्य विज्ञान
सी-सॅट - पेपर २, वेळ २ तास व २०० गुण
१) आकलन (Comprehension)
२) संप्रेशन कौशल्यासह आंतरवैयक्तिक कौशल्य (Interpersonal Skills including communication Skills)
३) तर्कशुद्ध युक्तिवाद आणि विश्लेषण क्षमता (Logical Reasoning & Analytical Ability)
४) निर्णय घेणे आणि समस्या निराकरण (Decision Making & Problem Solving)
५) सामान्य मानसिक क्षमता (General Mental Ability)
६) मूलभूत अंकगणित (इयत्ता दहावी स्तर) माहितीचा अर्थ लावणे तक्ते, आलेख, टेबल माहितीची पूरकता इ. ((Basic Numeracy ( rq level), Data Inturpetation ( rq Level)
७) मराठी आणि इंग्रजी भाषेचे आकलन इयत्ता दहावी स्तर पातळी (English Language, Comprehension Skills 10 level)
वरील सर्वासाठी निगेटिव्ह माìकग एकतृतीयांश (१/३) इतकी आहे, म्हणजे तीन प्रश्न चुकलेत की बरोबर आलेल्या गुणांमधून एका प्रश्नाचे गुण कमी होतात. यामुळे परीक्षा थोडी अवघड झाली आहे. आता हवेत गोळ्या मारण्याची संधी नाही. तुम्हाला उत्तर बरोबर माहीत असेल तरच तुम्ही उत्तर देणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका ही मराठीत नसते. एकतर ती इंग्रजीत असते किंवा िहदीत असते. प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरूपाची असते.
सी-सॅट पेपर १ - हा पेपर सामान्य अध्ययनाशी संबंधित आहे. या पेपरमध्ये १०० प्रश्न २०० गुणांसाठी विचारले जातात. जर अभ्यासक्रम पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते, याचा आवाका फारच मोठा आहे. या पेपरचा अभ्यास करताना सर्वप्रथम मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित अभ्यासाव्यात. कोणत्या घटकावर प्रश्न विचारले गेलेत ते समजून घ्यावेत, मला नेहमीच असे वाटते की, वढरउ साठी मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका हेच खऱ्या अर्थाने मार्गदर्शकाचे काम करतात. जर २०११ व २०१२ च्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे आपण त्याची विभागणी करू शकतो.
२०११ मध्ये - इंडिया इअरबुकवर ९ प्रश्न, विज्ञान तंत्रज्ञानावर १८ प्रश्न, अर्थशास्त्रावर १७ प्रश्न, भूगोलावर ११ प्रश्न, पर्यावरणावर २१ प्रश्न, भारतीय राज्यघटनेवर आठ प्रश्न, इतिहासावर १२ प्रश्न विचारले गेले होते.
२०१२ मध्ये - इंडिया इअरबुकवर ९ प्रश्न, विज्ञान तंत्रज्ञानावर ९ प्रश्न, अर्थशास्त्रावर १० प्रश्न, भूगोलावर ११ प्रश्न, पर्यावरणावर २३ प्रश्न, भारतीय राज्यघटनेवर १८ प्रश्न, इतिहासावर २० प्रश्न विचारले गेले होते. जास्तीतजास्त प्रश्न हे वरील विषयातील चालू घडामोडींशी संबंधित होते.
बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी पूर्वपरीक्षा अवघड होऊन बसते. प्रश्नांचे स्वरूपच बऱ्याच काळापर्यंत विद्यार्थ्यांना समजत नाही. यू.पी.एस.सी.च्या पूर्वपरीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची विभागणी आपण खालील प्रकारे करू शकतो.
१) काही प्रश्न हे एक स्टेटमेंट व त्याला चार पर्याय दिले असतात व त्यातील एक योग्य पर्याय निवडायचा असतो.
उदा. १८५७ चा उठाव खालीलपकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाला?
अ) लॉर्ड डलहौसी ब) लॉर्ड कॅिनग
क) लॉर्ड वेलेस्ली ड) यांपकी नाही
२) काही प्रश्नांत दोन ते तीन विधाने दिलेली असतात. त्यांपकी कोणते विधान बरोबर आहे, असा प्रश्न विचारला जातो.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या प्रकारचे प्रश्न ही जास्त डोकेदुखी ठरतात, मात्र या प्रश्नांचा योग्य प्रकारे सराव केल्यास, तसेच अभ्यास व्यवस्थित असेल तर हे प्रश्न सोडविणे सोपे जाते.
उदा. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) सुभाषचंद्र बोस यांनी हरीपुरा आणि त्रिपुरा या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविले.
२) भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते.
अ) विधान १ बरोबर २ चूक ब) विधान २ बरोबर १ चूक
क) विधान १ व २ बरोबर ड) विधान १ व २ चूक
उत्तर - भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी जे. बी. कृपलानी हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते.
उदा. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) आझाद िहद सेनेची स्थापना जपान येथे झाली.
२) भारत-ब्रम्हदेश सरहद्दीवरील आझाद िहद सेनेच्या तुकडीचे नेतृत्व शहानवास खाँ याने केले.
३) आझाद िहद सेनेच्या शिपायांना शिक्षामुक्त करण्यासाठी लाल किल्ल्याचा खटला प्रसिद्ध आहे.
अ) विधान १ व २ बरोबर आहे.
ब) विधान २ व ३ बरोबर आहे.
क) विधान १ व ३ बरोबर आहे.
ड) विधान १, २ व ३ बरोबर आहे.
उत्तर - आझाद िहद सेनेची स्थापना सिंगापूर येथे झाली.
३) Asseration / Reason या प्रकारचे प्रश्न :
या प्रकारच्या प्रश्नात दोन स्टेटमेंट दिली जातात व त्यावरून प्रश्न विचारला जातो .
उदा. Asseration (अ) : IUCN रेड डाटा बुकद्वारा धोक्याच्या पातळीवर असलेल्या आणि अतिसंरक्षणाची गरज असलेल्या वन्यजीवांबद्दल माहिती मिळते :
Reason (फ) : पांढरा हत्ती, पाणघोडा, व्हेल, डॉल्फीन हे नामशेष होण्याच्या मार्गावरील प्राणी आहेत.
अ) विधान अ व फ ही दोन्ही विधाने बरोबर असून फ चे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ब) विधान अ व फ ही दोन्ही विधाने बरोबर असून फ हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
क) विधान अ बरोबर फ चूक आहे.
ड) विधान अ चूक फ बरोबर आहे.
विद्यार्थ्यांनी या प्रकारची उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
४) घटनेचा क्रम लावणे या प्रकारची उदाहरणे (Sequencing Type)
उदा. १) पंजाबमधील कुका उठाव २) दिल्ली दरबार
३) पहिला फॅक्टरी अ‍ॅक्ट ४) इलबर्ट विधेयक
अ) १, २, ४ व ३ ब) १, २, ३ व ४
क) २, ३, १ व ४ ड) १, ४, ३ व २
उदा. कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनात खालील देशाचा योग्य क्रम लावा.
अ) अमेरिका - चीन - रशिया - भारत
ब) अमेरिका - रशिया - चीन - भारत
क) रशिया - अमेरीका - भारत - चीन
ड) चीन - अमेरिका - रशिया - भारत
५) जोडय़ा लावा प्रकारची उदाहरणे
उदा. स्थानिक वारे व त्यांचे प्रदेश यांच्याबाबत योग्य
जोडय़ा लावा.
अ) फॉन- १) रॉकी पर्वत
ब) चिनुक २) आल्प्स पर्वत
क) सॅटा अ‍ॅना ३) कॅलिफोíनया
ड) झोंडा ४) अर्जेन्टिना
A B C D
a) १ २ ३ ४
b) २ १ ३ ४
c) ३ ४ १ २
d) ४ ३ २ १
उदा. खाली वृत्तपत्र व त्यांचे संस्थापक दिले आहेत. त्यांपकी योग्य जोडी कोणती, ते सांगा.
१) कॉमरेड - मुहम्मद अली जिन्हा
२) अलहिलाल - मौलाना अहममुल्ला
३) कॉमनवील - अ‍ॅनी बेझंट
अ) फक्त १ व २ ब) फक्त ३ व २ क) फक्त १ व ३ ड) वरीलपकी सर्व
उदा. खालीलपकी योग्य जोडी कोणती?
१) महात्मा फुले - प्रार्थना समाज
२) वि. रा. िशदे - शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन
३) डॉ. आंबेडकर - पीपल्स एज्युकेशन सोसायटी
४) एम. पी. रानडे - डेक्कन सभा
यूपीएससीचा अभ्यास व कोचिंग क्लासची भूमिका
बऱ्याच वेळी हा प्रश्न मला विचारला जातो की, यू.पी.एस.सी.ची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लासची गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे द्यावयाचे म्हटले तर मी म्हणेन की, तुम्ही कोचिंग क्लासशिवाय पास होऊ शकता. तुम्ही केलेल्या अभ्यासामुळे तुम्ही यशस्वी ठरतात. त्यात कोचिंग क्लासची भूमिका फारच थोडी आहे. त्यातही तो क्लास दर्जेदार असावा. कोणताही कोचिंग क्लास तुमच्या अभ्यासासाठी लागणारा
वेळ हा कमी करून देतो. मात्र अभ्यास तुम्हालाच करायचा आहे व पेपरही तुम्हालाच लिहायचा आहे. बऱ्याच वेळी विद्यार्थ्यांकडून एक मोठी चूक होते ती म्हणजे ते ज्या कोचिंग क्लासमध्ये या परीक्षेची तयारी करत असतात त्याच कोचिंग क्लासवर
त्यांनी दिलेल्या पुस्तकांवरच व अभ्याससाहित्यांवर अवलंबून असतात. ज्यांना या परीक्षेचे ज्ञान आहे तो कोणीही असा
दावा करू शकत नाही की, आम्ही जे शिकवतो तेवढय़ाच अभ्यासावर तुम्ही या परीक्षेत यशस्वी होऊ शकतात. असा
दावा कोणी करत असेल तर त्यांना यू.पी.एस.सी. समजली नाही असे मी खात्रीने म्हणतो. म्हणून विद्यार्थ्यांने त्या कोचिंग क्लास व अभ्यास साहित्याबरोबर काही दर्जेदार पुस्तकांचे वाचन, तसेच मागच्या प्रश्नपत्रिकेची वेळोवेळी उजळणी करून प्रश्न कसा विचारला गेला आहे, कोणत्या भागावर विचारला गेला आहे हे समजून अभ्यास केल्यास त्याचा फायदा होतो. स्वत:च्या नोट्स स्वत: तयार कराव्यात. या परीक्षेसाठी निवडलेल्या जाणाऱ्या उमेदवाराकडून बऱ्याच गुणांची अपेक्षा संघ लोकसेवा आयोग करत असते. त्यामुळे कोणत्याही कोचिंग क्लासमध्ये शिकताना अथवा बाजारात उपलब्ध असलेल्या नोट्सचा वापर करताना आपली मते, आपले विचार व्यवस्थित मांडण्याची सवय सुरुवातीपासूनच करावी. जर एखाद्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला असेल तरीही काही प्राथमिक पुस्तके यांचा अभ्यास आवश्यक करावा.
शेवटी यश तुम्हालाच मिळणार आहे, म्हणून प्रयत्नही तुम्हालाच करावे लागणार..!

article is from LOKSATTA

यू.पी.एस.सी. आणि यशापयश

स्पर्धा परीक्षा हा एक कैफ आहे. जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही, तोपर्यंत तो उतरत नाही. स्पर्धा परीक्षेसंबंधी एक वास्तव आहे, ते समजून घेणे आवश्यक आहे. खरं तर आयुष्यात पदोपदी स्पर्धा असते. स्पर्धातील सहभाग हा घडवणारा, जीवनाला समृद्ध करणारा अनुभव आहे. जर या परीक्षेत यश मिळाले तर प्रशासकीय सेवेत प्रवेश करता येतो. समाजासाठी धोरणे राबविण्याचे काम समाधान देणारे असतेच, त्यासोबत आर्थिक स्थर्य, करिअरची सुरक्षितता येते. मात्र, खूप प्रयत्न करूनही अपयश आलेच तर अभ्यास वाया जात नाही, तो आयुष्यभर कामी येतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि या अभ्यासाचा अनुभव आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बळ देतो.
यूपीएससीच्या अंतिम निकालात अपयशी ठरलेल्या माझ्या एका मित्राला समजावताना मी एकदा म्हणालो होतो, 'हे अपयश म्हणजे तुझे जीवन नाही.' तेव्हा तो म्हणाला, 'मी माझ्या आयुष्यात फक्त आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं, मी त्याच्यासाठीच जगलो, मी अपयशी ठरलो आहे, आज आयुष्यात पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतंय. आयुष्य नीरस झालंय, गेल्या कित्येक दिवसांपासून मी या प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे, खरंच स्पर्धापरीक्षेत अपयशी ठरलो, म्हणजे आयुष्यात अपयशी ठरलो असे आहे का?' याचं उत्तर आहे - 'नक्कीच नाही.'
स्पर्धा परीक्षा ही मुळात वेगवेगळ्या टप्प्यांवरची परीक्षा, निवडप्रक्रिया अशी सुमारे एक ते दीड वर्ष चालते. अभ्यासाचे एक वर्ष धरले तर उमेदीची अडीच ते तीन वर्षे. त्यात दुसरा किंवा तिसरा प्रयत्न असेल तर स्पर्धा परीक्षेद्वारे निवडप्रक्रिया ही जवळजवळ पाच वष्रे चालणारी, काही जणांच्या बाबतीत हा काळ जास्त वर्षांचा असण्याची शक्यता असते आणि एवढं केल्यानंतरही यश मिळाले तर ठीक, परंतु, अपयशी ठरलो तर निराशा येणे साहजिकच आहे. कारण उमेदीची वष्रे निघून गेलेली असतात, त्यातही आपल्या मित्रांची निवड झाली व आपली झाली नाही तर अपयश जिव्हारी लागणारे असते.
दरवर्षी चार ते साडेचार लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात, त्यातही जागांची संख्या जास्तीत जास्त हजारांपर्यंत असते. गणिताच्या कोणत्याही नियमाचा आधार घेतला, तरी असं होतं की काही चांगल्या मुलांनाही अंतिम यादीत स्थान मिळत नाही.
एका विशिष्ट मर्यादेपेक्षा उत्तम तयारी करूनही जर यश मिळाले नाही, तरी निराश होण्याचे काही कारण नाही. जीवन हे यूपीएमसी, एमपीएससी किंवा अन्य कोणत्याही तात्कालिक यश अपयशाहून खूप मोठे आणि मोलाचे आहे.
यासाठी स्पर्धापरीक्षेची तयारी लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जर पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच अभ्यासाला सुरुवात केलीत, तर पदवी मिळेपर्यंत बराच अभ्यास झालेला असतो व त्यानंतर एक वर्ष अभ्यासाची एक विशिष्ट पातळी गाठली जाते आणि यश मिळण्याची शक्यता वाढते. अभ्यास करताना आपले पदवीनंतरही शिक्षण सुरू ठेवावे. उमेद न सोडता, प्रत्येक प्रयत्नातून शिकत यशस्वी होण्यासाठी निरंतर प्रयत्न चालू ठेवावेत.
स्पर्धा परीक्षेत यश नक्कीच मिळेल, हे मात्र सांगता येत नाही, किंबहुना ज्याला स्पर्धा परीक्षा कळली तो मात्र या परीक्षेची खात्री देऊ शकणार नाही, यश मिळविण्यासाठी प्रयत्न कमी न होऊ देता एका पर्यायी करिअरचे नियोजन करून ठेवले तर जास्त चांगले, हवंतर त्याला Plan B म्हणा. तुमच्यावर या Plan B ची वेळ येऊ नये, अशी मात्र मनापासून इच्छा आहे.
संघ लोकसेवा आयोगाच्या किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तुमची निवड व्हावी, तरीही पर्यायी करिअरच्या तयारीचा शासकीय सेवेतही, आयुष्यातही उपयोग होतो.
बऱ्याच वेळा एक प्रश्न विचारला जातो, काम करत तयारी शक्य आहे का, याचे उत्तर जरा अवघड आहे, कारण प्रत्येकाला लागू पडेल असे उत्तर देणे कठीण असते. मात्र, जर आपण एवढय़ा मोठय़ा जबाबदारीच्या पदाची अपेक्षा करत असू, तर मग दिवसाचे कमीत कमी ८ ते १२ तास झोकून देऊन अभ्यास करायलाच हवा.
जीवन प्रत्येकाच्या वाटय़ाला वेगवेगळे आलेले असते, काहींसाठी आयुष्य हे फारच सोपे असते, मात्र काहींना आयुष्यात गरिबी, आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो. त्यांना काम करण्याशिवाय पर्यायही नसतो. तुम्ही पूर्ण वेळ देऊन अभ्यास केला की नोकरी करत अभ्यास केला, याला महत्त्व नाही. तुम्ही दिल्लीत जाऊन अभ्यास केला की एखाद्या झाडाखाली बसून केला यालादेखील महत्त्व नाही. महत्त्वाचे एवढेच आहे की तुमचा अभ्यास होणे आवश्यक आहे, शक्यतो पूर्ण वेळ अभ्यास करणे आवश्यक आहे, मात्र घरच्या जबाबदारीमुळे नोकरी करण्याची वेळ आली तर धीर न सोडता मिळेल तेवढय़ा वेळेत अभ्यास करावा, मात्र परीक्षेच्या पहिल्यांदा देण्यापूर्वी किंवा पहिला प्रयत्न झाल्यानंतर एक वर्ष पूर्ण वेळ अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.
पहिल्या प्रयत्नात जर यश नाही मिळाले तर प्रयत्न सोडून न देता चुकांचा आढावा घ्यावा. आपल्यातील उणिवा दूर करण्यासाठी ज्येष्ठ तज्ज्ञ किंवा मित्र परिवाराबरोबर चर्चा करावी. अभ्यास साहित्य अपडेट करून घ्यावे. तोच पेपर थोडासा अभ्यास करून सोडवून पाहवा, जर आपण मुख्य परीक्षेच्या टप्प्यावर अपयशी झालो असलो, तर आपण का अपयशी ठरलो, याची कारणमीमांसा करावी, मुख्य परीक्षेत शब्दमर्यादा आपण पाळली होती का? निबंधाचा पेपर लिहिताना काही अडचणी आल्या का? पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेला गेल्यानंतर आपण फाजील आत्मविश्वासात पेपर लिहिला होता का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढच्या प्रयत्नांसाठी उपयुक्त ठरतात. मागील प्रयत्नांत झालेल्या चुका दूर करून पुढच्या प्रयत्नांसाठी तयार व्हावे, म्हणजे यश मिळण्याची शक्यता जास्त वाढते.
मुख्य परीक्षेचा पेपर मराठीतून लिहावा की इंग्रजीतून लिहावा, हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत सोडत नसतो. परंतु मला नेहमीच वाटते, पेपर कोणत्याही भाषेत लिहिला तरी त्याचा फारसा फरक पडत नाही, तुम्ही तुमचे विचार ज्या माध्यमातून व्यक्त करू शकता ते माध्यम निवडावे. दोन वर्षांपूर्वी जर तुम्ही मुख्य परीक्षा इंग्रजीतून दिली असेल, तर मुलाखत ही इंग्रजीमधूनच द्यावी लागत असे, मात्र आता तुम्ही मुख्य परीक्षा इंग्रजीतून लिहिली असेल, तरी मुलाखत मात्र मराठीतूनही देता येते. मात्र इंग्रजीचा विनाकारण धसका घेऊ नये. इंग्रजी जर अगदीच कच्चे असेल तर ते प्रयत्नपूर्वक सुधारण्याचा प्रयत्न करावा. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी बरेच संदर्भ ग्रंथ इंग्रजीत आहेत, इंटरनेटवरून माहिती घ्यावयाची असेल तर तीही माहिती ही इंग्रजीत आहे. आज इंग्रजी ही ज्ञान-विज्ञानाची भाषा, दळणवळणाची भाषा आहे, आंतरराष्ट्रीय संबंधांची भाषा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत व एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत काही घटकांसाठी इंग्रजी अनिवार्य आहे. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला इंग्रजीचा एक स्वतंत्र अनिवार्य पेपर आहे, जरी त्याचे गुण अंतिम गुणांमध्ये मोजले जात नसले तरी हा पेपर जर पास झाले तरच मुख्य परीक्षेचे इतर पेपर तपासले जातात व या पेपरमध्ये नापास झालात तर इतर पेपर तपासले जात नाहीत, हे लक्षात ठेवावे. थोडक्यात इंग्रजीचा अत्यंत द्वेष करणे योग्य नाही आणि इंग्रजीची भीती बाळगणेही योग्य नाही. इंग्रजीविषयीचे भयगंड आणि न्यूनगंड काढून ते सुधारण्यासाठी प्रयत्न करावा.
समजा, एवढे प्रयत्न करूनही जर आपण अपयशी ठरलोच, तर आपण जीवनातील सर्व काही गमावून बसलो, असे समजण्याचे कारण नाही. स्पर्धा परीक्षेत एक विचित्र सत्य आहे, कधीकधी पात्रता असूनही काही विद्यार्थ्यांची निवड शेवटपर्यंत होत नाही. स्पर्धा परीक्षा त्यातल्या त्यात संघ लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी हा प्रवास आहे. या प्रवासादरम्यान आपण संपादन केलेली गुणसंपदा हीच या प्रवासातील शिदोरी आहे. स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने भरपूर अभ्यास होतो, सामान्यज्ञान, इतिहास, भूगोल यांचा अभ्यास करताना मेंदू तल्लख होतो.
हा प्रवास आपल्यापासून सुरू झालेला असतो आणि आपल्याजवळ येऊनच पोहचतो. ज्या फळाच्या अपेक्षेने आपण कर्म करीत असतो, एक दिवशी आपणास जाणवतं की, कर्म करण्यातच खरा आनंद आहे, मौज आहे.
नागरी सेवांच्या माध्यमातून आपण सार्वजनिक सेवेत पोहचतो. या सेवेत असताना कायदा व्यवस्था सांभाळताना लोककल्याणकारी कामे करण्याची संधी मिळते. स्थर्य आणि सुरक्षिततेच्या बाबतीत म्हणाल तर राज्य घटनेनेच सुरक्षिततेची हमी दिली आहे (१४ वा भाग, कलम ३०८ व ३१४) मर्यादित स्वरूपात का होईना पसा, जीवनशैली, सुरक्षितता आणि
शक्ती या सर्व गोष्टी नागरी परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर मिळतात. याहून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागरी सेवांचा यूपीएससीचा अभ्यास करतानाच इतर परीक्षेचाही अभ्यास होऊन जातो. उदा. यूपीएससी व एमपीएससीच्या प्राथमिक (पूर्व) परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे व जर यूपीएससीच्या मुख्य
परीक्षेचा सामान्य अध्ययनाचा अभ्यास केला तर एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययनासाठी आपणास विशेष
श्रम पडणार नाहीत, म्हणजे यूपीएससीचा अभ्यासक्रम इतर परीक्षेसाठी पूरक आहे. अनेकदा अभ्यास करताना बऱ्याच
वेळा निराशा येते व जर एक-दोन प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर निराशा जास्तच वाढत जाते. त्यातही एखादा मित्र असा असतो की, त्याचे पूर्ण अटेम्प्ट संपल्यानंतरही त्याला यश मिळत नाही, परंतु त्याच्या अपयशाकडे पाहून स्वत:चे प्रयत्न कमी
करू नयेत.
प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, त्या व्यक्तीला लागू पडलेला नियम आपल्याला लागू पडेल असे नाही. भोवतालच्या परिस्थितीकडे पाहून किंवा या परीक्षेतील अस्थिरता जाणून आपण निराश होण्याचे कारण नाही, आपल्या हातात अभ्यास करणे एवढेच आहे, रोज मनापासून अभ्यास करत आपली गुणवत्ता वाढवत न्यावी. बाह्य़ परिस्थितीवर आपले नियंत्रण नसते. मात्र आपण काय करावे हे आपल्या हातात आहे, अभ्यास कधीच वाया जात नसतो, जीवनात यश-अपयश, सुख-दु:ख, अपेक्षा, अवहेलना इ. पासून कुणाची सुटका नाही. ज्याचा स्वत:वर विश्वास आहे, आपल्या स्वप्नांवर विश्वास आहे, जो सतत प्रयत्न करीत राहतो, त्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही. आज ना उद्या त्याचा विजय होणारच असतो.
या परीक्षेचा अभ्यास करताना देश बदलण्याचा, समाज बदलण्याचा विचार थोडा बाजूला ठेवला, तर एक गोष्ट लक्षात येते, या परीक्षेचा अभ्यास म्हणजे खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकासाची कार्यशाळा आहे. या परीक्षेच्या अभ्यासाचा नियम जीवनासही लागू पडतो. तुम्ही जिंकलात तर तुम्हाला सारं काही मिळेल आणि प्रयत्न करूनही तुम्ही अपयशी झालात तर सारेच उद्ध्वस्त झाले असे नाही, अभ्यास करताना तुम्ही ज्या गोष्टींचा सामना केला आहे तो अनुभव आयुष्याच्या इतर लढाया जिंकण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरणारच आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, येथे जिंकलात तर जिंकलात आणि हरलात तरी जिंकलात..!

article is from LOKSATTA

विश्लेषणक्षमता आणि तार्किक युक्तिवाद

article from LOKSATTA
स्पर्धा परीक्षेतील सामान्य क्षमता चाचणीत विश्लेषण, क्षमता आणि तार्किक युक्तिवाद या घटकांशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करण्याविषयीचे मार्गदर्शन-

मागील लेखात आपण 'सामान्य क्षमता चाचणी'तील मालिका पूर्ण करणे, समान संबंध, विसंगत घटक व सांकेतिक भाषा यावर आधारित प्रश्नांची सविस्तर चर्चा केली. या लेखात सामान्य क्षमता चाचणीतील उर्वरित प्रश्नांच्या तयारीबाबत तसेच विश्लेषण क्षमता आणि तर्कशास्त्रीय युक्तिवाद या तीन घटकांतील प्रश्न आणि अभ्यास याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

(१) आकृत्यांमधील रिकाम्या जागी अथवा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधण्यासाठी आकृत्यांमधील दिलेल्या संख्यांचा परस्परांशी असलेला संबंध शोधायचा असतो. त्या संख्यामध्ये रकान्यातील किंवा ओळीतील बेरीज समान असणे, त्यांच्यातील अनेक गणिती संबंध तपासणे, वर्तुळाच्या बाहेरील संख्यांचा वर्तुळातील संख्येशी असलेला संबंध ओळखणे त्यासाठी वर्तुळाच्या बाहेरील सर्व संख्यांची बेरीज किंवा गुणाकार तसेच त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज करून त्यास एखाद्या संख्येने भाग दिला असता वर्तुळाच्या आतील संख्या मिळते. वर्तुळाच्या बाहेरील समोरासमोरील संख्यांच्या जोडय़ांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करून वर्तुळाच्या आतील संख्या मिळते.









या उदाहरणात समोरासमोरील संख्यांचे गुणाकार करून त्यांची बेरीज केली आहे व त्या बेरजेला प्रत्येक वेळी ७ ने भाग दिला आहे. जसे- आणि म्हणून हे उत्तर येईल.









(1) 62 (2) 72 (3) 60 (4) 70

उत्तर : चौकोनातील प्रत्येक रकान्यातील पहिल्या व दुसऱ्या संख्येच्या बेरजेला तिसऱ्या संख्येने गुणल्यास चौथी संख्या मिळते. जसे,

(8 + 5) x 3 = 13 x 3 - 39,

(4 + 7) x 4 = 11 x 4 - 44,

(9 + 3) x 5 = 12 x 5 - 60

म्हणून

(5 + 4) x 8 = 9 x 8 - 72 (पर्याय - 2 )

(२) वेन आकृत्यांच्या वापरावर आधारित चार प्रकारे प्रश्न विचारले जातात - अंकगणित, आकृतीवाचन, घटकांमधील परस्पर संबंध स्पष्ट करणे व तर्कशात्रीय युक्तिवादातील विधाने व अनुमाने. अंकगणितावरील प्रश्नांमध्ये वेन आकृतीवरील उदाहरण पाहू.

एका वर्गातील 65% व 75% विद्यार्थी अनुक्रमे इंग्रजी व गणित या विषयात पास झाले 50% विद्यार्थी दोन्ही विषयांत पास झाले तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयांत नापास झाले?

एकूण विद्यार्थी 100 समजू -





दिलेल्या माहितीवरून कमीत कमी एका विषयात पास विद्यार्थी = 15 + 25 + 50 = 90 म्हणून दोन्ही विषयांत नापास विद्यार्थी = 100 - 90 = 10%

घटकांमधील परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी विचारलेल्या प्रश्नात प्रत्येकी तीन घटकांचा एक संच दिलेला असतो. त्या घटकातील परस्पर संबंध ओळखून कोणती वेन आकृती तो संबंध स्पष्ट करेल ते उत्तर द्यायचे असते. उदा. संच- कुटुंब, बहीण, भाऊ यात 'कुटुंब' हा सर्वात मोठा घटक असून बहीण व भाऊ हे दोन वेगवेगळे घटक कुटुंबाचे सदस्य आहेत. म्हणून



ही आकृती योग्य उत्तर होय.

३) आकृत्यांची संख्या मोजणे यावर आधारित प्रश्नांमध्ये कोन, त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत मोजण्याच्या प्रश्नाचा समावेश होतो. या आकृत्या मोजण्यासाठी विशिष्ट मर्यादेपर्यंत सूत्रे वापरता येतात. मात्र काही क्लिष्ट आकृत्यांमध्ये ते एक एक करून मोजावे लागतात. उदा.

या आकृतीत एकूण 28 त्रिकोण आहेत. जसे सर्वात लहान त्रिकोण = 12, दोन-दोन त्रिकोण एकमेकांना जोडून = 12 चार - चार त्रिकोण एकमेकांना जोडून = 4



(4) दिशा ज्ञान किंवा दिशाबोध यावरील प्रश्नांची उत्तरे देताना नकाशाचा विचार करावा - दिलेली माहिती आकृतीबद्ध केल्यास योग्य उत्तर कमीत कमी वेळेत देता येते. तसेच काही संख्यांचा समावेश असेल तर काटकोन त्रिकोणातील पायथागोरस प्रमेयाचा वापर करावा लागतो. उदा. नयना तिच्या घरापासून उत्तरेकडे 4 कि.मी. चालत गेली नंतर ती उजवीकडे काटकोनात वळून 6 कि.मी. चालली शेवटी तिने डावीकडे काटकोनात वळून आणखी 4 कि.मी. अंतर कापले आता ती तिच्या घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे?



दिलेल्या माहितीवरून, नयनाचा मार्ग खालीलप्रमाणे सोबतच्या आकृतीत, काटकोन त्रिकोण ADE मध्ये पायथागोरस प्रमेय वापरून,

(AD)2 = (AE)2 + (DE)2

= (1)2 + (8)2 = 100

\ AD = 10 कि.मी. ईशान्य दिशेला

(5) नाते संबंधांवरील प्रश्न दोन प्रकारचे असतात -

१. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा परिचय करून देताना सांगितलेल्या माहितीवर आधारित व २. एकाच कुटुंबातील सदस्यांचे संबंध स्पष्ट करताना , , , , ... या वर्णाचा वापर केलेला असतो.

नाते संबंधांवर आधारित उदाहरणे पाहू : एक छायाचित्र दाखवून एक गृहस्थ म्हणाला, ''मला बंधू किंवा भगिनी नाहीत, पण या माणसाचे वडील हे माझ्या पित्याचे पुत्र आहेत.'' तर ते छायाचित्र कोणाचे?

छायाचित्रातील माणसाचे वडील हे त्या गृहस्थाच्या वडिलांचा मुलगा आहे. म्हणजे त्या माणसाचे वडील हा तो गृहस्थ आहे. म्हणजे ते छायाचित्र त्या गृहस्थाच्या मुलाचे होय.

(6) क्रम व मोजणी - या घटकावरील प्रश्नांमध्ये एखादी व्यक्ती वा वस्तूच्या एखाद्या ओळीत सुरुवातीपासून वा पाठीमागून तसेच डावीकडून किंवा उजवीकडून येणाऱ्या क्रमांकांवर आधारित माहिती दिलेली असते. त्या माहितीचे योग्य प्रकारे विश्लेषण करून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे असते. काही वेळा रांगेतील दोन व्यक्तींनी आपापसातील जागांची अदलाबदल केल्यानंतर तयार होणाऱ्या क्रमावर आधारित देखील प्रश्न विचारले जातात.

उदा. माणसांच्या एका रांगेत कैलासचा डावीकडून पाचवा क्रमांक असून प्रशांतचा उजवीकडून सहावा क्रमांक आहे. जेव्हा कैलास व प्रशांत यांनी आपापसात जागेची अदलाबदल केली तेव्हा कैलासचा डावीकडून 13 वा क्रमांक येतो. त्या ओळीत जागेची अदलाबदल केल्यानंतर प्रशांतचा उजवीकडून कितवा क्रमांक येईल?

(1) 7 वा (2) 11 वा (3) 14 वा (4) 18 वा

उत्तर : जागेची अदलाबदल केल्यानंतर कैलासचा डावीकडून 13 वा क्रमांक येतो, परंतु त्या जागेचा उजवीकडून सहावा क्रमांक आहे. यावरून, त्या रांगेतील एकूण माणसांची संख्या = 13 + 6 - 1 = 18 आहे.

प्रशांतची नवीन जागा ही पूर्वीची कैलासची डावीकडून पाचव्या क्रमांकाची होती.

म्हणून प्रशांतचा उजवीकडून क्रमांक = 18 - 4 = 14 वा (पर्याय - 3 )

(7) दिनदíशकेवरील प्रश्न सोडविताना काही मूलभूत गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे. जसे वर्षांत एकूण 12 महिने त्यात 4 महिने प्रत्येक 30 दिवसांचे 7 महिने प्रत्येकी 31 दिवसांचे व फेब्रुवारी हा महिना 28 किंवा 29 दिवसांचा असतो. आठवडा सात दिवसांचा असल्यामुळे दर सात दिवसांनी तोच वार येतो. एखाद्या वर्षी ठराविक तारखेस एखादा वार असेल तर त्यापुढील वर्षी त्याच तारखेस येणारा वार हा एका दिवसाने (लीप वर्षांचा परिणाम नसल्यास) किंवा दोन दिवसांनी (लीप वर्षांचा परिणाम असल्यास) पुढील वार असतो. जसे 11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार असल्यास 11 ऑगस्ट 2003 रोजी सोमवार व 11 ऑगस्ट 2004 रोजी बुधवार येईल.

(8) घडय़ाळाबाबत वस्तुस्थितीवर आधारित गोष्टी जसे ठराविक काळात तासकाटा व मिनीटकाटा एकमेकांच्या अगदी विरुद्ध अथवा एकमेकांवर किती वेळा येणे, घडय़ाळात ठोके पडणे या बाबी असतात तसेच दर तासाला मागे अथवा पुढे जाणारे घडय़ाळ, तासकाटा व मिनीटकाटा यांचा वेग व त्या काटय़ामधील कोन या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. तासकाटा व मिनीटकाटा यांच्यातील कोनाचे माप काढण्यासाठी हे सूत्र 30H - 11 M आहे. उदा. 8 वाजून 20 मिनिटे

उदा. 8 वाजून 20 मिनिटे -

30 x 8 11 x 20 = 1300

2

(9) वयांवरील प्रश्न : हे प्रश्न सोडवताना सर्वात लहान सदस्याच्या वयासाठी एखादे चल मानावे, समीकरणे तयार करणे, सरासरी व गुणोत्तर या संकल्पना स्पष्ट असणे गरजेचे आहे.

उदा. दहा वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तीनपट होते. दहा वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती?

10 वर्षांपूर्वी, मुलाचे वय = ७; \ वडिलांचे वय = ७

आज मुलाचे वय, वडिलांचे वय

10 वर्षांनंतर, मुलाचे वय = (७ + 20), वडिलांचे वय (3७ + 20)

दिलेल्या माहितीवरून,

3७ + 20 = 2 (७ + 20)

\ ७ = 20

वडिलांचे आजचे वय - = 3७ + 10 = 70

मुलाचे आजचे वय - = ७ + 10 = 30

= 70 = 7:3 गणित गुणोत्तर होय.

30

(10) कूट प्रश्न - यामध्ये अशा गोष्टीवर प्रश्न विचारतात की ज्यामध्ये काही दुर्मीळ अशा संकल्पना असतात. उदा. शाळेतील एक शिपाई 6 घंटा देण्यासाठी 30 सेकंद वेळ घेतो. तर 12 घंटा देण्यासाठी त्याला किती वेळ लागेल?

घंटांमधील अंतर मोजण्यासाठी पहिल्या घंटेपासून सुरुवात करावी लागेल. याचा अर्थ कोणत्याही लगतच्या दोन घंटांमधील वेळ = 30 = 6

5

सेकंद कारण 6 घंटांमध्ये 5 अंतरे येतील.

\ 12 घंटांमध्ये 11 अंतरे होतील. यावरून, अपेक्षित वेळ = 11 = 66 सेकंद

विश्लेषण क्षमता चाचणी

या उपघटकातील प्रश्नांमध्ये उमेदवाराच्या विश्लेषण क्षमतेची तपासणी केली जाते. यात वर्गीकरण, तुलना, बठक व्यवस्था, घटनाक्रम, निर्णयक्षमता यांचा समावेश होतो. वर्गीकरणामध्ये माहितीच्या आधारे सारणी तयार करावी लागते. उदा. एका शाळेतील पाच विद्यार्थाचा निकाल आहे A, B, C, D व E हे विद्यार्थी असून मराठी, िहदी, इंग्रजी व गणित हे चार विषय आहेत.

A, B व D हे गणित व इंग्रजीत पास आहेत.

B व C हे इंग्रजी व मराठीत पास आहेत.

D, C व E हे िहदी व मराठीत पास आहेत.

A, D व E हे इंग्रजी व िहदीत पास आहेत. यावर प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खालीलप्रमाणे सारणी तयार करता येईल.



यावरील कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देता येतील. तुलनात्मक माहितीमध्ये वस्तूंच्या अथवा व्यक्तींच्या विविध गुणधर्माची तुलना केली जाते. जसे उंची, वजन, आवड, खेळ यांचा समावेश होतो. बठक किंवा आसन व्यवस्थेमध्ये एका ओळीत, रकान्यात किंवा वर्तुळाकार रचना विचारात घेली जाते. घटनाक्रमामध्ये वेगवेगळ्या घटनांबाबत ओबडधोबड माहिती दिली जाते, त्या माहितीचे विश्लेषण करून त्या घटनांचा योग्य क्रम लावणे अपेक्षित असते. अशा प्रकारे उमेदवारांची विश्लेषण क्षमता तपासली जाते.

तार्किक युक्तिवाद

यामध्ये अ‍ॅरिस्टॉटल यांच्या सायलोजिझम या निष्कर्ष पद्धतीवर आधारित माहितीच्या आधारे अनुमाने काढावयाची असतात, तसेच विधाने व गृहीतके आणि विधाने व युक्तिवाद यावर प्रश्न विचारलेले असतात.

सायलोजिझम या पद्धतीत दिलेली माहिती ही वास्तव घटनांशी कितीही विपरीत असली तरी ती पूर्णपणे सत्य मानावयाची असते. म्हणून वास्तव घटना व या पद्धतीनुसार निघालेले निष्कर्ष हे परस्पर विसंगत असू शकतात. दिलेल्या विधानातील पदे पूर्णपणे विभाजीत होणाऱ्या संकल्पनांवर निष्कर्ष अवलंबून असतात. सायलोजिझम या तर्कप्रणालीमध्ये वेगवेगळ्या नियमांचा वापर करून निष्कर्ष काढले जातात.

गृहितकांसंदर्भात विधान करतेवेळी ज्या गोष्टी गृहीत धरलेल्या असतील त्या तपासण्यासाठी प्रश्न विचारलेले असतात. उदा. 'धावत्या आगगाडीबाहेर डोकावू नका' - आगगाडीच्या डब्यातील एक सूचना या प्रश्नात - 'अशा सूचनांचा परिणाम होतो, धावत्या आगगाडीबाहेर डोकावणे धोक्याचे आहे, रेल्वे प्रशासनाची प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची कर्तव्यपूर्ती' या गृहीतकांचा समावेश होतो.

वादविवाद स्पध्रेमध्ये ज्याप्रमाणे एखाद्या विषयाबाबत सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे मुद्दे असतात, त्या प्रकारे या उपघटकावरील प्रश्नांमध्ये एका विषयावर दोन मुद्दे दिलेले असतात त्या मुद्यांपकी कोणता/ते मुद्दा सबळ आहे, त्यावर आधारित उत्तर द्यायचे असते. अशाप्रकारे तर्कशात्रीय युक्तिवादावरील प्रश्नांची तयारी करताना वेगळा दृष्टिकोन ठेवावा लागतो.

'बुद्धिमत्ता चाचणी' या घटकावरील प्रश्नांच्या संदर्भात आपण एकूण तीन भागांमध्ये माहिती घेतली आहे. एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या गतवर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचे विश्लेषण केल्यास त्याचप्रमाणे या घटकासंदर्भातील विविध पुस्तकांतील प्रश्नांचा भरपूर सराव केल्यास या प्रश्नांचे पकीच्या पकी गुण मिळण्यास मदत होईल. आपणास सर्वाना परीक्षेसाठी शुभेच्छा!

यू.पी.एस.सी. पूर्वपरीक्षा झ्र् सीसॅट



article from LOKSATTA
स्वप्न जेवढे मोठे असेल तेवढय़ा अधिक अडथळ्यांना, संकटांना तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे. तुम्ही जेवढा उंच जाण्याचा प्रयत्न कराल तेवढय़ा उंचीच्या अग्निदिव्यातून जावे लागेल. लक्षात ठेवा, एखाद्या ध्येयाचा पाठपुरावा करताना, सर्व प्रयत्न करूनही अपयशी ठरलात तर वाईट वाटण्यासारखे काही नाही. कारण जीवनाच्या या पटावर हार-जीत असणारच आहे. मात्र, आपल्या ध्येयासाठी तुम्ही प्रयत्नच केले नाहीत तर त्यासारखी दुर्दैवी गोष्ट या जगात कोणतीच नाही. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करतानाही तुमच्या जीवनात निराशेचे अनेक क्षण येतील. या वाटेवर अनेक संकटांचा सामना तुम्हांला करावा लागेल, मात्र स्वप्नांवर विश्वास ठेवून तुमचे सारे लक्ष ध्येयावर केंद्रित करून वाटचाल करत राहिल्यास तुम्हालाच लक्षात येईल की, चालताना सहजता निर्माण झाली आहे. पाय रस्त्यावर आत्मविश्वासाने रोवतपडू लागले आहेत..

आज आपण पूर्वपरीक्षेच्या पेपर - २ (सीसॅट २)बद्दल माहिती घेणार आहोत, २०११च्या पूर्वपरीक्षेत ऐच्छिक विषयाच्या जागी सीसॅट ( Civil Services Apptitude Test) पेपर २ हा अंतर्भूत केला आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे शास्त्रशुद्ध चाचण्यांद्वारे विश्लेषण करून तुमच्या गुणांबद्दल सांगणाऱ्या चाचण्या म्हणजे अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टस् होय. यूपीएससीने हा पेपर पूर्वपरीक्षेसाठी अंतर्भूत करण्याआधीदेखील या प्रकारच्या चाचण्या एमबीए, बँकिंग, विविध विदेशी विद्यापीठात घेतल्याच जात होत्या. या वर्षीपासून एमपीएससीने देखील सीसॅट - पेपर २ याच अभ्यासक्रमावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पेपरमध्ये ८० प्रश्न २०० गुणांसाठी दोन तासांत सोडवायचे असतात. संघ लोकसेवा आयोगाने पूर्वपरीक्षेसाठी खालील अभ्यासक्रम अंतर्भूत केला आहे.

१) आकलन (Comprehension) :

या घटकाअंतर्गत काही उतारे दिलेली असतात व त्यावर प्रश्न विचारले जातात. उतारे हे एकतर इंग्रजीत किंवा िहदीत असतात. ते मराठीत दिलेले नसतात. एमपीएससीच्या परीक्षेत हे उतारे मराठीत असतील. २०११-२०१२ या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी या घटकाची योग्य तयारी न केल्याने तसेच अभ्यासाचे आणि वेळेचे नियोजन न करता आल्याने ते अपयशी ठरलेत. काही विद्यार्थ्यांनी प्रथम उतारा इंग्रजीत वाचण्यास सुरुवात केली, तो न समजल्याने उतारा िहदीत वाचण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा उपलब्ध वेळ गेला व ते प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवू शकले नाहीत. म्हणून उतारा कोणत्याही एकाच भाषेत वाचा. एकतर इंग्रजीत किंवा िहदीत उतारा वाचण्यापूर्वी जर वेगात प्रश्न वाचून घेतलेत तर नक्की तुम्हाला कुठे जायचे व कोणत्या प्रश्नांची उत्तरे द्यावयाची हे माहीत असतात, म्हणून कमीत कमी वेळेत तुम्ही उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल. अर्थात उतारा वेगात व्यवस्थित वाचून त्याचे लवकरात लवकर विश्लेषण करता येणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी भरपूर सराव आवश्यक आहे. किंबहुना तुम्ही दैनिक वृत्तपत्र वाचतानाच तो वेगात वाचण्याची सवय करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या आधी संघ लोकसेवा आयोगाने विचारलेल्या मागच्या प्रश्नपत्रिकेतील उतारे सराव म्हणून सोडवून पाहणे आवश्यक आहे. काही विद्यार्थी सरळ परीक्षेच्या दिवशीच या उताऱ्यांना हात लावतात ते अजिबात योग्य नाही. किंबहुना या परीक्षेत अपयशी होण्यासाठी ते एक कारण ठरू शकते. तुम्ही कितीही हुशार असाल आणि तुमचा वाचण्याचा वेग कितीही असेल तरीही या प्रकारच्या प्रश्नांचा परीक्षापूर्व सराव न करणे हे घातकच आहे. कारण परीक्षेच्या दिवशी त्या दोन तासांत तुम्ही प्रचंड तणावात असता व त्या ठिकाणी तुम्हाला रिटेक घेण्यासाठी संधी नसते म्हणून परीक्षेपूर्वी या घटकाची व्यवस्थित तयारी करावी.

२) संवाद कौशल्यासह आंतर वैयक्तिक कौशल्य (Interpersonal Skill Including Communication Skills) :

लोकांशी, समूहाशी संवाद कौशल्य हा प्रशासनात काय, जीवनाच्या सर्वच क्षेत्रात उपयोगी पडणारा घटक आहे. आपण प्रशासनात जाणार आहात तेथे वरिष्ठ, कनिष्ठ लोकप्रतिनिधी, नागरिक, प्रसारमाध्यमे यांच्यासोबत आपला संपर्क येणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्यांची निवड होणार आहे, त्यांच्या अंगी संवाद कौशल्य चांगले असावे. हे पाहाण्यासाठीच हा भाग अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. खरंतर याचा उपयोग सर्वात जास्त मुलाखतीच्या वेळेस होतो.

उदा. यूपीएससी-२०१२ साथग्रस्त खेडय़ातील लसीचे वितरण करणारे तुम्ही मुख्य अधिकारी आहात, तुमच्याकडे लसीची एकच कुपी आहे, गावाचा सरपंच आणि एका ग्रामस्थाला त्या लसीची गरज आहे, लस त्याला स्वतला देण्यासाठी गावाचा सरपंच दबाव आणत आहे, तुम्ही काय कराल?

अ) लसीच्या अधिक पुरवठय़ासाठी आवश्यक ती प्रक्रिया कार्यान्वित कराल.

ब) अन्य गावातील वितरकामार्फत गरीब ग्रामस्थाला लस पुरवाल.

क) दोघांच्या गरजेची निकड जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांना डॉक्टरांकडे पाठवाल.

ड) अन्य गावातील वितरकामार्फत सरपंचाला लस पुरवाल.

३) निर्णयक्षमता व समस्या निवारण : प्रशासनात येऊ इच्छिणाऱ्या युवकांच्या अंगी कोणताही प्रश्न व्यवस्थित हाताळण्याचे अंगभूत कौशल्य असणे आवश्यक आहे. प्रशासनात आल्यानंतर आपणास असे अनेक प्रसंग येतील की, जेव्हा फक्त तुम्हाला एकटय़ाला योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. मागच्या वर्षी प्रश्नपत्रिकेत या घटकावर जे प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांसाठी निगेटिव्ह माìकग पद्धती नव्हती.

उदा. २०१२ मध्ये प्रश्न क्रमांक ७४ पासून ८० पर्यंत प्रश्न या भागावरच विचारले होते.

उदा. तुमच्या दुय्यम अधिकाऱ्याने तयार केलेल्या अंतिम अहवालाविषयी तुमचे काही मतभेद आहेत, हा अहवाल तातडीने सादर करावयाचा आहे. दुय्यम अधिकारी आपल्या माहितीचे समर्थन करीत आहेत, अशा प्रसंगी तुम्ही -

अ) दुय्यम अधिकारी चूक असल्याचे त्याला पटवून द्याल.

ब) अहवालाचा पुनर्वचिार करण्यास त्याला सांगाल

क) तुम्ही स्वत: अहवालात बदल कराल.

ड) आपल्या चुकीचे समर्थन करू नये, असे त्याला सांगाल.

उदा. दुर्गम प्रदेशात पाणीपुरवठय़ाचा एक प्रकल्प राबविण्यास तुम्हाला सांगितले जाते. या प्रदेशातील लोकांच्या उत्पन्नाचा स्तर कमी आहे. तेथील २५ टक्के लोक दारिद्य््रारेषेखालील आहेत. प्रकल्पाच्या खर्चाचा निर्णय घेण्याच्या बठकीत तुम्ही -

अ) पाणीपुरवठा सर्वस्वी मोफत असावा, अशी शिफारस कराल.

ब) पाण्याचा वापर करणाऱ्यांनी फक्त एकदा निश्चित रक्कम नळाच्या जोडणीसाठी द्यावी आणि पाणी मोफत वापरावे, असे प्रतिपादन कराल.

क) दारिद्य्ररेषेवरील लोकांनी दरमहा ठराविक पाणीपट्टी द्यावी आणि दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना मोफत पाणी पुरवावे, अशी शिफारस कराल.

ड) पाण्याच्या वापरासाठी पाणीपट्टी आकारली जावी आणि दारिद्य्ररेषेखालील कुटुंबासाठी पाण्याचा किमान वापर मोफत असावा, अशी शिफारस कराल.

४) सामान्य मानसिक क्षमता (General Mental Ability) : या घटकाचा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सराव करावा. सामान्यत: बुद्धिमत्ता या घटकाखाली प्रश्न आपण अभ्यासले असतील, तशा प्रकारचे प्रश्न या घटकावर विचारले जातात. २०१२ च्या 'यूपीएससी'च्या पूर्वपरीक्षेत या घटकावर विचारलेले काही प्रश्न-

उदा. सनिक छावणी देशांच्या अन्य भागांना जोडणारे अ, इ, उ, ढ, द आणि फ असे सहा रस्ते आहेत. त्यापकी कोणत्याही एका वेळेस अ, ढ आणि फ यांपकी एक रस्ता खुला असतो. इ बंद असल्यास द देखील बंद असतो. वादळामध्ये अ आणि इ यांपकी फक्त एक रस्ता खुला असतो. या माहितीच्या आधारे कोणते विधान बरोबर आहे ?

अ) साधारण परिस्थितीमध्ये फक्त तीन रस्ते खुले असतात.

ब) वादळामध्ये किमान एकतरी रस्ता खुला असतो.

क) पूर आल्यास फक्त तीन रस्ते खुले असतात.

ड) संकटकाळी सर्व रस्ते बंद असतात.

उदा.

२) अ, इ आणि उ या तीन व्यक्तींनी काळा, निळा आणि नारंगी रंगाचे शर्ट घातले असेल तरी ते त्याच क्रमाने घातलेले नाहीत. त्यांच्या विजारी हिरव्या, पिवळया आणि नारंगी असल्यास तरी त्याच क्रमाने त्यांनी घातलेल्या नाहीत. एकाही व्यक्तीने एकाच रंगाचा शर्ट आणि विजार घातलेली नाही, आणखी काही तपशील पुढे दिला आहे.

१) अ ने काळा शर्ट घातलेला नाही.

२) इ ने निळा शर्ट घातलेला नाही.

३) अ ने हिरवी विजार घातलेली नाही.

४) इची विजार नारंगी रंगाची आहे.

उ ने घातलेली विजार आणि शर्ट अनुक्रमे कोणत्या रंगाचे असतील ?

अ) नारंगी आणि काळा ब) पिवळा आणि निळा

क) हिरवा आणि निळा ड) पिवळा आणि काळा

५) मूलभूत अंकगणित, तक्ता आलेख ( Basic Numeracy) : या घटकाबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतो की, यात गणिताचा किती भाग समाविष्ट असेल. मात्र २०११ व २०१२ या प्रश्नपत्रिकेवरून २०१२ मध्ये जवळजवळ १३ प्रश्न तेही अत्यंत सोपे या घटकावर विचारले गेले होते तर २०१२ मध्ये फक्त चार प्रश्न या घटकावर विचारले होते. या घटकाच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी दहावीपर्यंत शिकलेल्या गणिताच्या मूलभूत संकल्पना समजून घ्याव्यात, जास्त आकडेमोड करावी लागेल किंवा जास्त मोठे प्रश्न शक्यतो परीक्षेत विचारले जात नाहीत.

उदा. २०१२च्या संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खालील प्रश्न विचारले होते.

उदा. ताशी सरासरी ४८ कि.मी. वेगाने श्रीयुत कुमार कामावर जातात. पहिले ६० टक्के अंतर पार करण्यासाठी त्यांना उरलेले अंतर पार करण्याच्या वेळापेक्षा १० मिनिटे जास्त लागतात. त्यांचे कार्यालय किती अंतरावर आहे ?

अ) ३० कि.मी. ब) ४० कि.मी.

क) ४५ कि.मी. ड) ४८ कि.मी.

उदा. ( २०११ ) - वर्गातील १०० विद्यार्थ्यांपकी ६० टक्के विद्यार्थी क्रिकेट खेळतात, ३० टक्के फुटबॉल खेळतात आणि १० टक्के दोन्ही खेळ खेळतात. क्रिकेट किंवा फुटबॉल न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ?

अ) २५ ब) २० क) १८ ड) १५

तक्ते, आलेख यांचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम निरनिराळ्या प्रकारचे आलेख व त्यावरील प्रश्न सोडविण्याचा सराव करावा. २०११ व २०१२ मध्ये संघ लोकसेवा आयोगाने जे प्रश्न विचारले होते, ते अत्यंत सोपे होते. त्यामुळे या घटकाबद्दल जास्त भीती बाळगू नये.

६) इंग्रजी भाषेचे आकलन (English Language Comprehension Skills) : दर्जा दहावीपर्यंत पहिला घटक आकलन व हा सहावा घटक इंग्रजी भाषेचे आकलन यात फरक असा आहे. आकलन या घटकास जे उतारे दिले असतात ते इंग्रजी व िहदी या दोन्ही भाषेत दिलेले असतात, ते थोडे अवघड व विचार करायला लावणारे असतात. मात्र इंग्रजी भाषेचे आकलन या घटकात असणारा उतारा फक्त इंग्रजीतच असेल त्याचे िहदी भाषांतर केलेले नसते. साधारणत: दोन किंवा तीन उतारे या घटकावर विचारले जातात.

सी-सॅट पेपर २चा अभ्यास करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:

१) सीसॅट पेपर २ मध्ये जास्तीत जास्त गुण मिळविण्याची सुवर्णसंधी असते. या पेपरमध्ये यशस्वी होण्यासाठी सुरुवातीपासून जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे.

२) खेळातला एक नियम आहे, जर तुम्हाला १०० मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यावयाचा असेल तर तुम्ही रोज २०० मीटर धावण्याचा सराव केला पाहिजे, हा नियम येथेही लागू पडतो. या प्रश्नपत्रिकेत फक्त ८० प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही १०० प्रश्न असतील या भूमिकेतून सराव केला पाहिजे, म्हणजे परीक्षेच्या दिवशी दोन तासांत फार तारांबळ उडणार नाही.

३) प्रश्नपत्रिकेतील प्रश्न काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. प्रश्नात दिलेला एक एक शब्द व्यवस्थित समजून घ्या. कारण एकेका शब्दाच्या फरकाने अर्थ आणि उत्तरसुद्धा बदलू शकते व अशा प्रश्नांचा सराव जास्तीतजास्त करावा.

४) प्रश्नपत्रिकेत आकलनावरचे प्रश्न आधी सोडवावेत की, सामान्य मानसिक क्षमतेवरील प्रश्न पहिले सोडवावेत? सीसॅट पेपर २ मध्ये किती प्रश्न सोडवावेत? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीगणिक बदलणारे आहे. सर्वाना लागू पडेल असा एक नियम नाही, परंतु ज्या प्रश्नांसाठी निगेटिव्ह माìकग नाही, असे प्रश्न सर्वात प्रथम सोडविण्यास घ्यावेत. ज्यांना अंकगणित व मानसिक क्षमता हा घटक सोपा वाटतो, त्यांनी शांत डोक्याने, अचूकपणे तो घटक सोडवून नंतर आकलन या घटकाकडे जावे. परीक्षेत सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देता यावीत, असा हट्ट धरू नये, जास्तीत जास्त प्रश्न वेळेत, अचूकपणे सोडविण्याचा प्रयत्न करावा. एकदा उतारा वाचण्यास घेतल्यास त्याची उत्तरे दिल्यानंतरच पुढच्या उताऱ्यावर जावे, उतारा अर्धवट सोडून दुसऱ्या प्रश्नाकडे गेल्यास उताऱ्यासाठी दिलेला वेळ वाया जातो.

५) अभ्यासक्रमात दिलेल्या घटकांपकी एखादा घटक कुणाला ना कुणाला अवघड वाटणार आहे, अशा घटकासाठी तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या किंवा ज्याला हा घटक व्यवस्थित जमतो अशा तुमच्या मित्राकडून हा घटक समजून घ्या, अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा. आपल्याला ज्याची भीती वाटते त्या घटकाचा जास्तीत जास्त सराव करा. मनातील भीती काढण्याचा हाच शास्त्रशुद्ध उपाय आहे.