- सांस्कृतिक सद्भावनेसाठी दिला जाणाऱ्या पहिल्या टागोर पुरस्काराने पंडित रविशंकर गौरविण्यात आले
- श्रीनिवासन हे अमेरिकेच्या न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक होणारे पहिलेच भारतीय तसेच दक्षिण आशियायी नागरिक आहेत.
- भांडवल बाजार नियंत्रक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला (सेबी) 2013 ला 25 वर्षे पूर्ण होत आहेत.
- भारतात वर्षभर सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात उपलब्ध असला, तरी 80 टक्के नागरिकांमध्ये "ड' जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे आढळले आहे.
- जर्मन बेकरी बॉंबस्फोट खटल्यातील एकमेव अटकेत असलेला आरोपी मिर्झा हिमायत बेग याला फाशीची शिक्षा सुनावली.
- महाराष्ट्र शासनाने तृतीयपंथींचा समावेश महिला राष्ट्रीय धोरणात केला असून, त्यांना महिलांप्रमाणे संपूर्ण मूलभूत सोयी-सुविधांचा लाभ देण्यात येणार आहे.
- तृतीयपंथींना गुलाबी रंगाची शिधापत्रिका देऊन रेशन दुकानातून स्वस्त किमतीत गहू, तांदूळ देण्यात येणार आहे.
- मल्याळम भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाने शिक्कामोर्तब केले
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे
- एक पाय गमावलेल्या माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुनिमा सिन्हा हिने जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी ती पहिली अपंग भारतीय ठरली आहे.
- To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in
Monday 10 June 2013
Current Affairs Package- 7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment