Saturday, 15 June 2013

युनोचा अहवाल-जागतिक लोकसंख्येचे भवितव्य 2102


  • येत्या इ.स. २०२८ पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल त्यावेळी भारताची लोकसंख्या १.४५ अब्जचा टप्पा ओलांडून जाईल.
  • त्यानंतरच्या काळात भारताची लोकसंख्या वाढत राहील व चीनची कमी होत जाईल, असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. जागतिक लोकसंख्येचे भवितव्य या अहवालात म्हटले आहे की, जगाची लोकसंख्या पुढील महिन्यात ७.२ अब्ज होईल व इ.स २१०० पर्यंत ती १०.९ अब्ज होईल.
  • इ.स. २०५० मध्ये जगाची लोकसंख्या ९.६ अब्ज होईल याचा अर्थ येत्या बारा वर्षांत लोकसंख्या दरवर्षी १० लाखांनी वाढत जाईल, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.
  • ही लोकसंख्यावाढ मुख्यत्वेकरून विकसनशील देशात होईल.
  • आफ्रिकेत ही वाढ निम्म्याहून अधिक असेल.
  • संपूर्ण जगाची लोकसंख्या सध्या ७.२ अब्ज आहे त्यातील वाढ ही कमी झालेली आहे पण आफ्रिका व काही विकसनशील देशात मात्र लोकसंख्या वेगाने वाढत आहे.
  • अहवालात असे म्हटले आहे की, २०५० पर्यंत विकसित देशांची लोकसंख्या बदलणार नाही ती १.३ अब्ज राहील.
  • याउलट विकसनशील असलेल्या ४९ कमी विकसित देशांची लोकसंख्या २०१३ मध्ये ९० कोटी आहे ती २०५० मध्ये १.८ अब्ज होईल.
  • पूर्वीच्या लोकसंख्या वाढीचे कल बघता आफ्रिकेतील १५ देशांमध्ये जनन दर जास्त राहणार आहे, तेथे प्रत्येक महिलेमागे मुलांचे प्रमाण हे ५ टक्क्य़ांपेक्षा अधिक असेल.
  • २०५० पर्यंत नायजेरियाची लोकसंख्या अमेरिकेपेक्षा जास्त होईल.
  • कालांतराने चीन, भारत, इंडोनेशिया, इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका या मोठय़ा विकसनशील देशात प्रत्येक महिलेमागे मुलांची संख्या घटत जाईल तर नायजेरिया, नायगर, काँगो, इथियोपिया व युगांडा या देशात प्रत्येक महिलेमागे होणाऱ्या मुलांची संख्या वाढेल.
  • अफगाणिस्तान व तिमोर-लेस्टे या देशात प्रत्येक महिलेमागे होणाऱ्या मुलांची संख्या पाच पेक्षा जास्त असेल.
  • माणसाचे आयुर्मानही विकनशील व विकसित देशात वाढत जाईल. २०४५-२०५० दरम्यान ते ७६ वर्षे राहील तर २०९५-२१०० दरम्यान ते ८२ वर्षे राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  
  • To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in