Saturday, 15 June 2013

"निकोबार'च्या जीववैविध्याचा युनेस्कोकडून बहुमान


  • युनेस्कोने आपल्या मनुष्य व जीवमंडळ कार्यक्रमांतर्गत भारताच्या निकोबार बेटांचा समावेश जागतिक जीवमंडळ क्षेत्रामध्ये (बायोस्फिअर रिजर्व) केला आहे.
  • या कार्यक्रमांतर्गत युनेस्कोचे सभासद देश देशामध्ये अशा प्रकारच्या जीवमंडळ क्षेत्राची स्थापना करतात.
  • येथील स्थानिक रहिवासी व विज्ञान यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून या क्षेत्राचा समतोल विकास साधला जातो.
  • निसर्ग व्यवस्थापनाच्या नव्या पद्धती व मानवी सहभागाचे परीक्षण, या निसर्ग व मानव यांच्यामधील नात्याचा आदर्श म्हणून गणल्या गेलेल्या जीवमंडळ क्षेत्रांमधून केले जाते.
  • निकोबार बेटांवर सुमारे 1800 वन्य जाती व जगामधील काही अतिसंरक्षित जमातींचा निवास आहे. निकोबार बेटांखेरीज जगामधील अन्य 11 नव्या ठिकाणांचा समावेश जागतिक जीवमंडळ क्षेत्र कार्यक्रमांतर्गत केला गेला आहे.
  • जगभरातील 117 देशांमध्ये अशा प्रकारची जीवमंडळ क्षेत्रे असून भारतामध्ये अशा प्रकारची 9 जीवमंडळ क्षेत्रे आहेत.
  • पाकिस्तानमधील झिरारत जंगल व चीनमधील स्नेक आयलंड या ठिकाणांचाही समावेश जीवमंडळ क्षेत्रामध्ये करण्यात आला आहे.

    To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

No comments:

Post a Comment