Thursday 25 April 2013

पश्चिम घाटात सापडल्या बेडकाच्या दोन नवीन प्रजाती

पश्चिम घाटात सापडल्या बेडकाच्या दोन नवीन प्रजाती

  • झाडावर राहणाऱ्या बेडकाच्या दोन नवीन प्रजाती पश्चिम घाटात सापडल्या आहेत.
  •  अनिल झछारिया व रॉबिन कुरियन यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत त्यांचा शोध लागला आहे. 
  • 'झूटॅक्सा' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
  • यातील एका प्रजातीला कर्नल रिचर्ड हेन्री बेडोम यांच्या नावावरून 'बेडोमिक्सालस' असे नाव दिले आहे. 
  • ब्रिटिश काळात मुख्य वनसंवर्धक असताना बेडोम यांनी बरेच मोठे काम केले आहे. 
  • दुसऱ्या प्रजातीला 'मरक्युराना' असे नाव दिले आहे. ब्रिटिश रॉक बँडमधील गायक फ्रेडी मक्र्युरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे नाव दिले आहे. पश्चिम घाटात झाडावर राहणाऱ्या बेडकांच्या ७ प्रजाती आतापर्यंत सापडल्या आहेत.

source: loksatta.com

No comments:

Post a Comment