Monday 29 April 2013

CURRENT AFFAIRS PACKAGE-1

  1. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने ई-ऑफिसपाठोपाठ मोबाइल ऑफिस प्रणाली कार्यान्वित करून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाला भारतातील पहिला मान मिळवून दिला आहे.
  2. गुजरातच्या पर्यटनाचे मुख्य आकर्षण असणाऱ्या गीर राष्ट्रीय वनोद्यानातील सिंह मध्य प्रदेशात पाठविण्याचा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश दिला आहे.
  3. आईच्या दुधाइतकीच प्रतिकारशक्ती खोबरेल तेलामध्येही असते, असे संशोधनात आढळले असल्याचा दावा "हिल फाऊंडेशन'ने नुकत्याच घेतलेल्या कार्यशाळेत केला. या कार्यशाळेत मोनोलॉरीन नावाच्या जैविकरीत्या सक्रिय रेणूत रूपांतरित होणाऱ्या लॉरिक आम्ल नावाच्या 12 कार्बन मध्यम साखळीच्या मेदाम्लाचा शोध लावण्यात आला. तो रोगांस कारणीभूत असलेल्या जीवाणू, विषाणू आणि बुरशीचा प्रभावीपणे नायनाट करतो, असे या संशोधनात सिद्ध झाले आहे. आईच्या दुधानंतर ते खोबरेल तेलात मोठ्या प्रमाणात आढळते, असे "हिल'चे संशोधन सांगते.
  4. ज्येष्ठ पार्श्वगायिका शमशाद बेगम (वय 94) यांचे आज (बुधवार) सकाळी वृद्धापकाळाने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. 
  5. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या पाचव्या वर्षांत उत्तर महाराष्ट्रातील जळगावमधील पाचोरा पोलीस ठाण्यानेशांतता पुरस्कार पटकाविला
  6. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा कान्स चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी सदस्यांत समावेश करण्यात आला आहे.
  7. गोव्यात बीचवर मद्याचे सेवन करण्यास बंदी-समुद्रकिनारी बसून मद्याचे सेवन केल्यानंतर अनेकजण जखमी होत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  8. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनाही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात येणारी 'झेड' दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकतेच त्यांना 'झेड' दर्जाची सुरक्षा पुरविण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
  9. सामान्यांना सहज वाचता न येणाऱ्या "डॉक्‍टर लिपी'तून "प्रिस्क्रिप्शन' लिहिण्याची पद्धत बंद करण्यासाठी "आयएमए'च्या मुंबई शाखेने पहिले पाऊल उचलले आहे. सुवाच्य अक्षरात "कॅपिटल लेटर'मध्ये किंवा छापील स्वरूपात "प्रिस्क्रिप्शन' लिहिण्याची सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिली आहे.
  10. नारळीच्या झाडावर चढून नारळ काढणाऱ्या पाडकरी-माडकरींना आता केंद्रीय नारळ बोर्डाने 'नारळमित्र' या नावाने संबोधण्याचे स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment