घातक कचरा निर्मितीत महाराष्ट्र देशात अव्वल
- धोकादायक व प्रदूषणयुक्त कचरा व टाकाऊ सामग्री निर्मितीत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.
- देशात वर्षभरात तयार होणाऱ्या 79 लाख टनांपैकी राज्यातील कचऱ्याचा वाटा सर्वाधिक 22.84 टक्के इतका असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे म्हणणे आहे.
- महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात (22.68 टक्के) आणि आंध्र प्रदेश (13.75) यांचे क्रमांक आहेत.
- महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, मध्य प्रदेश व छत्तीसगड ही सात राज्ये मिळून देशातील 82 टक्के प्रदूषणयुक्त कचऱ्याची निर्मिती करतात.
- सिमेंट, वीजनिर्मिती, पोलाद उद्योग आणि कालबाह्य टाकाऊ संगणक हे या घातक प्रदूषणयुक्त कचऱ्याच्या निर्मितीचे प्रमुख स्रोत आहेत.
- कचऱ्यावरील प्रक्रिया करणारे प्रकल्प 16 राज्यांमध्ये उभारण्यात आले आहेत.
- महाराष्ट्रात असे तीन प्रकल्प आहेत.
- धोकादायक कचरा...
- देशात वर्षभरात तयार होणारा कचरा =79 लाख टन
- महाराष्ट्राचा वाटा=22.84 टक्के
- कचऱ्यावर प्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील प्रकल्प=3
- सात राज्यांकडून होणारी कचऱ्याची निर्मिती =82 टक्के
To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in
No comments:
Post a Comment