रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना अतिमहत्वाच्या व्यक्तींना असलेली झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. अंबानी यांना असलेला धोका लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने अंबानी यांच्या सुरक्षेसाठी कमांडो पथकर देण्यास मान्यता दिली. अंबानींच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे देण्यात आली आहे. झेड दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत पायलट कार, त्यापाठोपाठ सशस्त्र कमांडो असतील. सुरक्षा संस्थांनी आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अंबानींना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले. त्यामुळे सीआरपीएफचे २८ जणांचे पथक अंबानींच्या सुरक्षा व्यवस्थेत असेल. जम्मू काश्मिर आणि पंजबमध्ये सरकारच्या उच्चपदस्थांना असलेल्या सुरक्षेप्रमाणे एखाद्या खासगी व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी पहिल्यांदाच केंद्रीय राखीव पोलीस दलाला देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment