- पाण्याखालून मारा करून सुमारे दीड हजार किमीपर्यंतच्या अंतरावरील शत्रूच्या ठिकाणचा वेध घेऊ शकणाऱ्या 'के-५' या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची भारताने रविवारी यशस्वी चाचणी केली.
- जमीन आणि हवेपाठोपाठ पाण्याखालूनही शत्रूवर हल्ला करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे अशी 'अण्वस्त्र त्रयी' असलेला भारत जगातील पाचवा देश बनला आहे.
- केवळ अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि चीन या देशांकडेच अशी क्षमता आहे.
- बंगालच्या उपसागरात पाण्याखाली उभारलेल्या तळावरून या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी झाली.
- 'आयएनएस अरिहंत'सारख्या देशी पाणबुडीवर हे क्षेपणास्त्र तैनात करता येईल. याशिवाय भारत 'के-१५' आणि 'ब्राह्मोस' या अनुक्रमे ७५० व २९० किमीपर्यंतच्या लक्ष्याचा पाण्याखालून भेद करणाऱ्या क्षेपणास्त्रांचाही विकास करत आहे.
Saturday 11 May 2013
भारताची यशस्वी 'अण्वस्त्र-त्रयी'
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment