अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा ऊर्जेचा वापर करणारा देश असल्याचे निष्पन्न झाले आहे. तथापि, विकसित देशांपेक्षा भारतातील ऊर्जेची दरडोई गरज कमी असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासन अहवालानुसार, अमेरिका, चीन आणि जपाननंतर भारताचा तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वापरातही चौथा क्रमांक लागत असल्याचे म्हटले आहे. भारत कच्चा तेलाच्या आयातीवर विशेषत: मध्य पूर्वेकडील देशांतून करण्यात आलेल्या आयातीवर अवलंबून असल्याचेही अहवालात म्हटले आहे. भारतातील ऊर्जानिर्मितीसाठी कोळशाला पर्याय म्हणून नैसर्गिक वायूचा वापर केला जातो, असेही अहवालात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment