Saturday 11 May 2013

गर्भसंस्कारांवर फ्रेंच संशोधकांचे शिक्कामोर्तब

डॉ. फॅब्रिक व्ॉलोइज यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंच संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार २८ आठवडय़ांच्या गर्भालाही 'गा' आणि 'बा' यातला फरक समजतो तसेच पुरुषाचा आवाज आणि स्त्रीचा आवाज यांच्यातला फरकही त्यांना ओळखता येतो. मुदतीआधीच जन्मलेल्या १२ अर्भकांच्या मेंदूपरीक्षेनुसार त्यांनी हे शोध लावले आहेत.
गर्भ २३ आठवडय़ांचा झाल्यावर कानाचा अवयव आणि ध्वनी ऐकण्याचे मेंदूतील तंतू आकारत असतात. त्यामुळे गर्भावस्थेतल्या मुलाला स्वरज्ञान होते, असे आधीच सिद्ध झाले आहे. मात्र त्या ज्ञानाच्या आधारावर मूल बोलायला शिकते की जन्मानंतर त्याला बोलायला शिकवले जाते त्यातून ते बोलायला शिकते, यावर मात्र दुमत आहे.

No comments:

Post a Comment