Tuesday, 7 May 2013

सौदी शाळांत मुलींना खेळाधिकार!

सौदी अरेबियात खासगी शाळांमध्ये मुलींना खेळ खेळण्याचा अधिकार अखेर मिळाला आहे. महिलांवरील र्निबध संपवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्या देशाच्या शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. सौदी वृत्तपत्रांनी याबाबत सरकारने केलेल्या सुधारित नियमांची माहिती दिली आहे. असे असले तरी या देशात जास्त मुली या सरकारी शाळांत शिकत असल्याने त्यांना मात्र या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. 
झाले काय?
२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकच्या वेळी सौदी महिलांच्या क्रीडा सहभागाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर सौदी अरेबियाने महिला अ‍ॅथलीट्सना प्रथमच ऑलिम्पिकला पाठवले होते. 'ह्य़ूमन राइट्स वॉच'ने तेव्हा असे म्हटले होते, की दोन सौदी महिलांनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला असला, तरी या आखाती देशात महिलांनी खेळात सहभागी होण्यावर बंदी आहे. सौदी महिलांवर गाडी चालवण्यापासून बंदी होती, तेथे चेहऱ्यापासून पायाच्या अंगठय़ापर्यंत अंग झाकणारे पोशाख महिलांना परिधान करावे लागतात.
बंधने काय?
खासगी शाळेतील मुलींना खेळण्याची परवानगी असली तरी त्यांनी पूर्ण व व्यवस्थित कपडे घालणे अपेक्षित आहे.मुलींसाठी महिला क्रीडा प्रशिक्षक ठेवणे गरजेचे आहे. या अगोदरही खासगी शाळांमध्ये तुरळक प्रमाणात शारीरिक शिक्षण दिले जात होते पण नियम पाळले जात नव्हते.

No comments:

Post a Comment