Saturday 11 May 2013

जगातील सर्वात लांब पल्ल्याची 'बुलेट ट्रेन' चीनमध्ये सुरू

  • दोन हजार २९८ किमीचे अंतर अवघ्या आठ तासांत
  • राजधानी बिजिंग ते दक्षिणेकडील गुआंगझोऊ शहराला जोडणाऱ्या जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या बुलेट ट्रेनचे चीनने उद्घाटन केले. ताशी ३०० किमी वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन बिजिंग ते गुआंगझोऊ दरम्यानचे दोन हजार २९८ किमीचे अंतर अवघ्या आठ तासांत पार करणार आहे.
  • बेस्ट ३
  • फ्रान्सची टीजीव्ही 
  • फ्रान्समधील टीजीव्ही ही ३०० कि.मी लांबीचा पल्ला गाठणारी बुलेट ट्रेन. यात पहिल्या वर्गासाठी खास वायफाय सु्विधा उपलब्ध करून दिल्या जातात. फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड या तीन देशांत ती वापरली जाते.
  • जर्मनीची आयसीई
  • ताशी ३०० कि.मी वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन टीजीव्हीची युरोपातील स्पर्धक म्हणून ओळखली जाते. याच कंपनीने चीनला बुलेट ट्रेनचे तंत्र विकले आहे.
  • जपानची शिनाकनसेन
  • ३५० कि.मी अंतर दोन तासांत पार पाडणारी जपानची ही ट्रेन २५० कि.मी वेगाने धावणारी व मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांची ने आण करणारी म्हणून ओळखली जाते.

No comments:

Post a Comment