Tuesday 7 May 2013

एड्सपेक्षाही घातक महाजिवाणू सापडला

एड्सपेक्षाही जास्त भयानक असलेला लैंगिक संबंधातून पसरणारा नवीन जिवाणू सापडला आहे. वैज्ञानिकांच्या मते तो एड्सपेक्षाही घातक ठरणार आहे. प्रतिजैविकांना दाद न देणारा हा 'गणोरिया' रोगास कारण ठरणारा जिवाणू असून तो जपानमध्ये दोन वर्षांपूर्वी आढळून आला आहे. या जीवाणूचे परिणाम हे एड्स विषाणूमुळे होणाऱ्या परिणामांशी मिळतेजुळते आहेत.
या जिवाणूापासून झालेल्या गणोरियामुळे सेप्टिक होते व प्रसंगी मृत्यू ओढवतो, असा इशारा नॅशनल कोअ‍ॅलिशन ऑफ एसटीडी डिसीजेस या संस्थेचे संचालक विल्यम स्मिथ यांनी दिला आहे. गणोरियाच्या या जीवाणूचे नाव 'एचओ ४१' असून तो दोन वर्षांपूर्वी जपानमधील एका लैंगिक सेविकेत आढळला आहे. सध्याच्या प्रतिजैविकांना हा जीवाणू दाद देत नाही. आतापर्यंत एमआरएसए व सीआरइ हे दोन महाजीवाणू प्रवर्गात आहेत त्यात आता या जिवाणूची भर पडली आहे. ज्यांना या जिवाणूची लागण होते त्यातील निम्मे प्राणास मुकतात व त्याची लागणही वेगाने होते.
नॅचरोपॅथिक मेडिसिनचे डॉक्टर अ‍ॅलन ख्रिसितयनसन यांनी सांगितले की, हा जिवाणू फारच आक्रमक असून तो जास्तीत जास्त लोकांवर घातक परिणाम करतो. सीएनबीसी न्यूजने म्हटले आहे की, एड्सने जगात ३ कोटी लोक मृत्युमुखी पडले असून गणोरियाच्या जीवाणूने मरण पावणाऱ्यांची संख्या नजीकच्या काळात अधिक असू शकते.

No comments:

Post a Comment