- 'भारताच्या कांस्य महिला' या नावाने परिचित असलेल्या प्रख्यात मूर्तिकार जसू शिल्पी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने निधन झाले. त्या ६४ वर्षांच्या होत्या.
- कांस्य धातूपासून मूर्ती तयार करणाऱ्या कलाकार म्हणून जसू शिल्पी यांना जगभरात मान होता.
- त्यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही पटकावले होते. गुजरातमधील महात्मा गांधींचा पुतळा, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे शिल्पी यांनी तयार केलेले पुतळे रेखीव आहेत.
- आपल्या कारकिर्दीत त्यांनी २२५ मोठे तर ५२५ मध्यम आकाराचे कांस्य पुतळे घडविले.
- त्यांनी तयार केलेला मार्टिन ल्युथर किंग यांचा पुतळा फ्लोरिडा विद्यापीठात बसविण्यात आला आहे.
Saturday, 11 May 2013
'भारताच्या कांस्य महिला' जसू शिल्पी यांचे निधन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment