Saturday 11 May 2013

सूर्याच्या अभ्यासासाठी लडाखमध्ये सर्वात मोठी सौर दुर्बीण उभारणार

  • सूर्याचे वातावरण, सौरडाग यांचा अभ्यास करण्यासाठी भारतात लडाख येथे जगातील सर्वात मोठी सौर दुर्बीण उभारली जाणार आहे.
  • या प्रकल्पाचा खर्च ३०० कोटी रूपये आहे.
  • हानळे किंवा मेरक येथे म्हणजे लडाखमधील पांगाँग सरोवराच्या जवळ हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
  • हे ठिकाण चीनलगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आहे.
  • सध्या जगातील सर्वात मोठी सौर दुर्बीण ही अमेरिकेतील अॅरिझोनातील कीट पीक नॅशनल ऑब्झर्वेटरी येथे असून तिचे नामकरण 'मॅकमथ-पीअर्स' असे करण्यात आले आहे. 
  • ही सौर दुर्बीण २ मीटर अॅपर्चरची असेल व तिची उभारणी २०१७ पर्यंत होणार आहे व २०२० पर्यंत ती जगातील सर्वात मोठी दुर्बीण असेल. अमेरिका त्यानंतर हवाई बेटांवर ४ अॅपर्चरची दुर्बीण उभारणार आहे. सौरडागांचे निरीक्षण करणे हा त्याचा प्रमुख हेतू आहे.
  • दुर्बिणीतील सुटे भाग विविध ठिकाणी तयार केले जाणार आहेत. जर्मनीतील हॅम्बर्ग वेधशाळेची मदत यात घेतली जाणार आहे.

No comments:

Post a Comment