निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाडांची संख्या कमी झाली असून त्यातील ९९ टक्के गिधाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत
पशूंवरील उपचारांसाठी वापरले जाणारे डायक्लोफेनेक हे औषध ही गिधाडे जेव्हा मृत जनावरे खातात, तेव्हा त्यांच्यातही येते व त्यांच्यातील महत्त्वाच्या अवयवात युरिक अॅसिडचे खडे तयार होतात. हे युरिक अॅसिड बाहेर टाकता न आल्याने ही गिधाडे मरतात, काही वेळा ती निर्जलीकरणामुळे मरतात. भारतात ७६ टक्के मृत गिधाडांचा व्हिसेरा तपासला असता त्यांना गाऊट झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या शरीरात डायक्लोफेनेकचा अंश सापडला असून हे औषध गिधाडांसाठी ३० ते ४० टक्के अधिक विषारी असते. जसे सायनाइड हे उंदरांना जास्त विषारी असते,
२००६ मध्ये गिधाडे कृती कार्यक्रम आखण्यात आला. डायक्लोफेनेक औषधावर बंदी घालण्यात आली तसेच गिधाडांच्या प्रजोत्पत्तीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. डायक्लोफेनेक या औषधांचा वापर पशूंवर करण्यास बंदी घातली असली, तरी मानवासाठीच्या वापराकरिता असलेले औषध आता जनावरांसाठी बेकायदेशीर रीत्या वापरले जात आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी म्हणजेच बीएनएचएस या संस्थेने हरयाणातील पिंजोर, आसाममधील राणी तसेच पश्चिम बंगाल या ठिकाणी गिधाडांची पैदास केंद्रे सुरू केली आहेत.

No comments:
Post a Comment