Saturday 11 May 2013

गर्लफ्रेंन्डची हत्या केल्याबद्दल 'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसला अटक

  • दक्षिण आफ्रिकेचा सुवर्णपदक विजेता अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याला आपल्या गर्लफ्रेंडची गोळ्या घालून हत्या केल्याबद्दल अटक करण्यात आली
  • 'व्हॅलेंटाईन डे'ला आश्चर्याचा धक्का द्यावा, म्हणून त्याची गर्लफ्रेंड त्याला न सांगता घरात आली. मात्र, कोणीतरी चोर घरात घुसला, म्हणून त्याने तिच्यावर गोळीबार केला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. 
  • 'ब्लेड रनर' म्हणून पिस्टोरियस क्रीडाविश्वात प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते. 
  • दोन्ही पायांनी अपंग असलेल्या पिस्टोरियसचा समावेश टाइम मॅगझिनने जगातील सर्वात प्रेरणादायी १०० व्यक्तींमध्ये केला आहे.

No comments:

Post a Comment