Friday 10 May 2013

म्यानमारच्या रस्त्यावर प्रथमच खासगी वर्तमानपत्र अवतरले

१९६४मध्ये लष्करी राजवटीने खासगी वर्तमानपत्रांवर बंधन घातले होते, मात्र जवळपास चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर २०११मध्ये खासगी प्रसारमाध्यमांवरील बंधने शिथिल झाल्यानंतर नागरिकांना खासगी वर्तमानपत्रे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आता १६ साप्ताहिक वृत्तपत्रांना दैनिकाचा दर्जा मिळाला असून त्यामध्ये म्यॅनमारच्या लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन स्यू की यांच्या पक्षाच्या वर्तमानपत्राचाही समावेश आहे.
लष्करी विरोध मावळल्यानंतर प्रथमच बर्मिज भाषेतून प्रकाशित होणाऱ्या द वॉइस, द गोल्डन फ्रेश लँड, द युनियन आणि द स्टँडर्ड टाइम ही वर्तमानपत्रे नागरिकांसाठी उपलब्ध झाली.

No comments:

Post a Comment