Tuesday, 7 May 2013

बांगलादेश, पाकिस्तानातून वॉल्ट डिस्ने गाशा गुंडाळणार

कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेचे कारण देऊन वॉल्ट डिस्ने कंपनीने बांगलादेश, पाकिस्तान आणि अन्य तीन देशांमधून पुढील एप्रिल महिन्यापर्यंत आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानातील कापड निर्यात व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. युकॅडोर, व्हेनेझुएला आणि बेलारूसमधील उत्पादनही बंद करण्यात येणार आहे, असे डिस्ने ग्राहक उत्पादन कंपनीचे अध्यक्ष बॉब चॅपेक यांनी सांगितले.
जागतिक बँकेने दिलेल्या अहवालावर आधारित आमचा निर्णय आहे. विश्वासार्हता, भ्रष्टाचार, हिंसाचार याचे प्रमाण किती आहे आणि देशाचा कारभार कसा आहे, याबाबत पाहणी करून त्यावर अहवाल सादर करण्यात आला होता. या निकषांवर सदर पाच देश अत्यंत खालच्या स्तरावर आहेत, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment