Tuesday 7 May 2013

पंकज चतुर्वेदी यांना 'विल्केनफील्ड' पुरस्कार प्रदान

मुंबईच्या टाटा मेमोरियल रूग्णालयातील भारतीय डॉक्टर पंकज चतुर्वेदी यांना यंदाचा 'ज्युडी विल्केनफिल्ड आंतरराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. भारतात तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
कर्करोग शल्यविशारद असलेले डॉ. पंकज चतुर्वेदी यांना 'तंबाखूमुक्त मुले' या मोहिमेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण भारतात जगामध्ये सर्वाधिक आहे. दरवर्षी तंबाखूने दहा लाख लोक मरण पावतात. ही संख्या दरवर्षी दहा जंबो जेट कोसळणे किंवा दरवर्षी दहा सुनामी किनाऱ्यांवर धडकण्याने होणाऱ्या प्राणहानीइतकी आहे.
धूम्रविरहित तंबाखूवर देशातील २८ पैकी २३ राज्ये व सात पैकी ५ केंद्रशासित प्रदेशात बंदी घालण्यात आली आहे. देशातील २० राज्यांत तंबाखूवरील कर हा वाढवण्यात आला आहे. कर वाढवल्याने तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर कमी होऊन ५० लाख लोकांचे प्राण वाचतात.

No comments:

Post a Comment