Friday, 10 May 2013

'डोमेन नेम'च्या न्यायालयीन लढाईत 'टाटा सन्स'चा विजय

'टाटा सन्स लिमिटेड' आणि त्याची दुय्यम कंपनी असलेली 'टाटा इन्फोटेक लिमिटेड' यांनी त्यांच्या 'www.tatainfotech.in' या 'डोमेन नेम'साठी दिल्ली उच्च न्यायालयातील लढाई अखेर जिंकली आह़े त्यामुळे 'अर्नो पालमेन'ला आता त्यांच्या कोणत्याही उपक्रमांमध्ये हे डोमेन नेम वापरता येणार नाही़
टाटा उद्योग समूहाची मुख्य गुंतवणूकधारक कंपनी असणाऱ्या टाटा सन्स लिमिटेडने दाखल केलेल्या खटल्यावर न्यायालयाने हा निकाल दिला़ 'अर्नो पालमेन'कडून वापरण्यात येणारे डोमेन नेम आणि ट्रेड मार्कमध्ये वापरण्यात येणारा टाटा हा शब्द यावर १९१७ साली स्थापन झालेली टाटा सन्स आणि त्याची दुय्यम कंपनी टाटा इन्फोटेक लिमिटेड यांनी आक्षेप घेतला होता़ हे शब्द वापरण्यापासून त्यांना परावृत्त करावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती़

No comments:

Post a Comment