- गेल्या १२ वर्षांत देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३३ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे आढळून आले आहे.
- केंद्रीय औद्योगिक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल २००० ते ऑक्टोबर २०१२ या कालावधीमध्ये महाराष्ट्रात तब्बल ६१.१३ अब्ज डॉलर गुंतवणूक झाली.
- त्याखालोखाल दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) ३५.४ अब्ज डॉलर परकीय गुंतवणूक झाली.
- या १२ वर्षांत देशात १८५.७ अब्ज डॉलर गुंतवणूक झाली.
- त्यानुसार, देशातील एकूण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आणि एनसीआरचा वाटा तब्बल ५२ टक्के आहे.
- महाराष्ट्र आणि एनसीआरमध्ये अधिक परकीय गुंतवणूक होण्यामागे येथील विकसित पायाभूत सुविधा आणि सरकारांचा सकारात्मक दृष्टिकोन ही कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
- महाराष्ट्र व एनसीआरपाठोपाठ कर्नाटकात १०.२५ अब्ज डॉलर गुंतवणूक झाली. त्यानंतर तामिळनाडू (९.६ अब्ज डॉलर), गुजरात (८.५३ अब्ज डॉलर), आंध्र प्रदेश (७.४१ अब्ज डॉलर) आणि प. बंगाल (२.०४ अब्ज डॉलर) यांचा क्रमांक लागतो.
Saturday, 11 May 2013
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment