Friday 10 May 2013

चंद्रावर उच्चारलेले पहिले शब्द

'वन स्मॉल स्टेप ऑफ अ मॅन, जायंट लीप ऑफ मॅनकाइंड' हे नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर उच्चारलेले पहिले शब्द होते असे मानले जात असले तरी प्रत्यक्षात तसे नाही. आर्मस्ट्राँग यांच्याबरोबरचा दुसरा चांद्रवीर बझ आल्ड्रिन याच्या तोंडचे 'काँटॅक्ट लाइट' हे चंद्रावर उच्चारले गेलेले पहिले शब्द होते असे आता स्पष्ट झाले आहे. अमेरिकेची ही चांद्रमोहीम १९६९मध्ये झाली होती. अपोलो ११च्या अंतराळवीरांनी वापरलेल्या मार्गदर्शिकेवरून हे स्पष्ट झाले आहे. या मार्गदर्शिकेचा लिलाव केला जाणार आहे. आल्ड्रिन याने वापरलेली ती स्वत:ची मार्गदर्शिका होती.

No comments:

Post a Comment