Saturday, 11 May 2013

वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या क्रमवारीत भारत १४० वा

  • जगभरातील १७९ देशांच्या निर्देशांकानुसार जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या क्रमवारीत भारत १४० व्या स्थानावर आह़े या मानांकनामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे स्थान २००२ सालच्या निर्देशांकापेक्षाही ९ ने घसरले आह़े 
  • पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढल्यामुळे आणि माहितीच्या मायाजालावर सातत्याने वाढविण्यात येणारी बंधने यामुळे भारताची क्रमवारी घसरल्याचे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक तयार करणाऱ्या 'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर' या संस्थेने म्हटले आह़े.
  • उलटपक्षी, साम्यवादी राजवट असणाऱ्या चीनचे मानांकन मात्र १ ने वधारले आह़े २००२ च्या निर्देशांकानुसार चीन १७२ व्या क्रमांकावर होता, तर २०१३ च्या निर्देशांकात तो १७३ व्या स्थानावर पोहोचला आह़े.
  • या मानांकनात सर्वोच्च स्थानावर फिनलँड, नेदरलँड आणि नॉर्वे हे तीन देश आहेत;
  • तर तुर्कमेनिस्तान, नॉर्थ कोरिया आणि इर्रिटेया हे तीन देश या यादीत सर्वात तळाला आहेत़

No comments:

Post a Comment