- केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) बाह्य हस्तक्षेपांपासून मुक्त करण्याचे विधेयक तयार करण्यासाठी केंद्र सरकारने मंत्रिगटाची स्थापना केली.
- केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम हे या मंत्रिगटाचे अध्यक्ष असतील.
- या मंत्रिगटामध्ये परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद, माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल, माहिती आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचा समावेश आहे.
- सीबीआयला बाह्य हस्तक्षेपांपासून मुक्त करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आणि त्या स्वरुपाचा कायदा करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिला होता.
- त्या पार्श्वभूमीवर सरकारने या मंत्रिगटाची स्थापना केली आहे.
Tuesday, 14 May 2013
सीबीआय मुक्त करण्याचे विधेयक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment